Breaking

Tuesday, February 7, 2023

ढिगाऱ्याखाली बाळाला जन्म देऊन आईने प्राण सोडले, व्हिडिओ पाहून काळजाचं पाणी होईल... https://ift.tt/OMYa2ke

नवी दिल्ली: सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये झालेल्या भयंकर भूकंपाची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अशातच एका नवजात बाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या नवजात बाळाला भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून काढण्यात आल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका नवजात बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत आहे. सीरियाच्या अलेप्पो शहरात झालेल्या भूकंपामुळे जी भीषण परिस्थितीत निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीत या नवजात बाळाचं जगणं हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही.एक गर्भवती महिला तिच्या घराच्या ढिगाऱ्यात अडकली होती आणि तेवढ्यात तिला प्रसूतीवेदना सुरु झाल्या. त्या महिलेने या ढिगाऱ्यातच एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने बाळाला ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दुर्दैवं म्हणजे त्याच्या आईला वाचवता आले नाही. त्यामुळे जन्मताच हे बाळ त्याच्या आईच्या मायेला मुकला आहे. इतकंच नाही तर या बाळाच्या कुटुंबातील कुणीही आता जिवंत नाही. त्यामुळे तो या जगात तर आला पण आता तो पोरगा झाला आहे. या भूकंपाने त्याला जन्मताच अनाथ केलं आहे.हेही वाचा - या बाळाचा जन्म ज्या परिस्थितीत झाला त्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या परिस्थितीत बाळाचा जन्म हा काही चमत्कारापेक्षा कमी नाही, असं अनेकजण सांगत आहेत. तुर्कस्तान आणि सिरियामध्ये सोमवारी पहाटे झालेल्या भूकंपाने चार हजार लोकांचा जीव घेतला. त्याशिवाय हजारो लोक ढिगाऱ्यात अडकल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अजूनही अनेकजण ढिगाऱ्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KmXsAoz

No comments:

Post a Comment