नवी दिल्ली: दिल्लीतील प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवनवीन गोष्टी पोलिसांच्या हाती लागत आहेत. याप्ररणातील आरोपी साहिल गेहलोतने १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास निगमबोध स्मशान भूमीच्याच्या कार पार्किंगमध्ये निक्कीची हत्या केली होती. हत्येनंतर तो आधी निकीचा मृतदेह आपल्या कारमध्ये घेऊन इकडे-तिकडे फिरला आणि नंतर मित्रांऊ गावातील त्याच्या 'खाओ पियो ढाब्या'वर जाऊन मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला आणि त्याच संध्याकाळी साहिलने लग्नही केलं.या प्रकरणी दिल्लीतील राजौरी गार्डन क्राइम ब्रँचचे इन्स्पेक्टर सतीश कुमार यांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार १३ फेब्रुवारीच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की साहिल गेहलोतने त्याची गर्लफ्रेंड निक्की यादवची हत्या करून मृतदेह गावात कुठेतरी लपवून ठेवला आहे. याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना मिळताच ते टीमसह धनसा स्टँड नजफगढ येथे पोहोचले आणि माहिती देणाऱ्याकडून माहिती गोळा केली. त्यानंतर पोलिसांनी साहिलचा शोध सुरु केला. पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली, पण तो तिथे नव्हता. त्याचा फोनही स्वीच ऑफ होता. रात्रभर खूप शोधाशोध झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गुप्तहेराच्या सांगण्यावरुन साहिल गेहलोत याला कायर गावाच्या वळणावर पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत तो पोलिसांना चकवा देत राहिला. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्याने एक एक करून सर्व काही सांगितलं. १० फेब्रुवारी रोजी निक्कीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह त्याच्या 'खाओ पियो ढाब्या'च्या फ्रीजमध्ये ठेवला.त्याच्या सांगण्यावरून पोलिसांचे पथक तात्काळ ढाब्यावर पोहोचले आणि तेथे ठेवलेला फ्रीज उघडला असता निक्कीचा मृतदेह समोर आला. पोलिसांना तपासात दिसून आले की, निक्कीने ब्लॅक टॉप, फिकट मिलिटरी ग्रीन कलर लोअर आणि ब्लू कलरचे शूज घातले होते, तिच्या मानेवर खुणा होत्या, त्यावरुन निक्कीचा गळा आवळून खून झाल्याचे कळून आलं. याशिवाय, पायावर आणि कमरेवरही खुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.इन्स्पेक्टर सतीश कुमार यांच्या निदर्शनाखाली क्राईम टीम आणि एफएसएल टीमने पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. टीमने फ्रीजच्या आतून आणि दरवाजातून केसांचे नमुने गोळा केले. यासोबतच पोलिसांना फ्रीजच्या आतून एक स्वॅबही मिळाला. फ्रीजजवळील बर्थ कंट्रोलही पोलिसांनी जप्त केला.यापूर्वी फ्रिजमधून पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे पोलिसांनी पुरावा म्हणून फ्रीज ताब्यात घेतला. तसेच, पोलिसांनी घटनास्थळावरून पांढरी विद्युत तार, कॉइल, अॅल्युमिनियमचे भांडे, एक ट्रॉली बॅग आणि महिलांची पर्सही पुरावा म्हणून जप्त केली.आरोपी साहिल गेहलोत याने पोलीस चौकशीत सांगितलं की, एकीकडे निक्की त्याला लग्न रद्द करून तिच्यासोबत राहायला सांगत होती. दुसरीकडे, त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे त्याने तिची हत्या केली आणि मग त्यात संध्याकाळी लग्नही केलं. निक्कीची हत्या केल्यानंतर साहिलने तिचे व्हॉट्सअॅप चॅटही डिलीट केले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QBYXCFk
No comments:
Post a Comment