Breaking

Sunday, February 12, 2023

चार पैकी २ मुलं झाली बेपत्ता; चार दिवसांनी दिसले धक्कादायक दृश्य, पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली https://ift.tt/F8dhqxk

: गेल्या चार दिवसांपासून असणारे जतच्या अमृतवाडी येथील दोघा बहीण-भावाचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आले आहेत. एका शेतमजुराची ही दोन मुलं चार दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर त्यांचे मृतदेह एका विहिरीत आढळून आले आहेत. सुलोचना गवळी (वय ५ वर्षे) आणि इंद्रजीत गवळी (वय ३ वर्षे) अशी या दोघा चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेमुळे अमृतवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा येथील आनंद गवळी व त्यांच्या पत्नी हे दोघेजण जत तालुक्यातल्या अमृतवाडी येथील बागायतदार शेतकरी दीपक हत्ती यांच्याकडे कामाला होते. चार दिवसांपूर्वी आनंद गवळी यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी आनंद गवळी यांनी पत्नीला जत या ठिकाणी उपचारासाठी नेले होते. यावेळी त्यांची असणारी चार मुलं घरात होती. सायंकाळी परत आल्यानंतर त्यांची दोन मुलं झोपलेली आढळून आली. तर सुलोचना व इंद्रजित ही मुलं ही गायब असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर घरात नसलेल्या दोघा बहीण भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. गावात आणि जत पोलीस पोलिसांच्याकडून देखील या मुलांचा शोध घेण्यात येत होता. तर मुलं सापडत नसल्याने अपहरणाचा तक्रार देखील दाखल झाली होती. घराजवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये ही मुलं पडल्याचा संशय आल्याने त्या ठिकाणी देखील शोध मोहीम राबवण्यात आली होती. मात्र त्या विहिरीत मुलं आढळून आली नव्हती. सर्वत्र शोध मोहीम राबवून देखील मुलं सापडत नसल्याने नेमकं या मुलांचं काय झालं किंवा ही मुलं कुठे बेपत्ता झाली,असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र अखेर आज दुपारी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या विहिरीमध्ये दुपारी ही दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचं आढळून आले. याबाबत अधिक तपास आता जत पोलीस करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tFl7UDK

No comments:

Post a Comment