नवी दिल्ली : चेतन शर्ना यांच्या स्टिंग ऑपरेशनमधून एकामागून एक गोप्यस्फोट पाहायला मिळाले. या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्व हादरले आहे. पण या स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा गोत्यात आले आहेत. कारण हे प्रकरण आता बीसीसीआयने गंभीरपणे घेतले आहे आणि कठोर पाऊल उचलायचे ठरवले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.चेतन शर्मा हे भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वीही चेतन शर्मा हे निवड समिती अध्यक्ष होते. पण टी-२० विश्वचषकात मानहानीकारक पराभव झाल्यावर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली होती. पण त्यानंतर जेव्हा नवीन निवड समितीची स्थापना करण्यात आली तेव्हा पुन्हा एकदा चेतन शर्मा यांना निवड समितीच्या अध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आले. चेतन शर्मा यांच्यावर बीसीसीआयने ही मोठी जबाबदारी सोपवली होती. पण आता एका स्टिंग ऑपरेशनने मात्र सर्व चित्रच बदलले आहे.चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. कारण चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन चांगलेच व्हायरल झाले आहे. ही गोष्ट बीसीसीआयला परवडणारी नक्कीच नाही. त्यामुळे बीसीसीआयने आता याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे ठरवले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, " चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशमुळे बीसीसीआयमधील व्यक्ती दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय चेतन शर्मा यांच्याबाबत कठोर निर्णय घेणार आहे. पण हा निर्णय नेमका कधी घेतला जाईल, हे अद्याप समोर आलेले नाही किंवा त्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण चेतन शर्मा यांच्या या प्रकरणानंतर उचलबांगडी होणार, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे निवड समिती अध्यक्ष म्हणून फार कमी काळ चेतन शर्मा यांच्याकडे उरलेला आहे." बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीयची डोकेदुखी वाढली आहे. स्टिंग ऑपरेशननंतर आतापर्यंत तरी बीसीसीायने कोणताही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे येत्या काही तासांत बीसीसीआय आपली भूमिका स्पष्ट करेल, असे दिसत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OF0sUBq
No comments:
Post a Comment