Breaking

Thursday, February 23, 2023

आई-बाबा, पत्नी अन् लेकीचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला, अंत्यसंस्कारावेळी अश्विनच्या शब्दांनी साऱ्यांना रडवलं... https://ift.tt/IaG789U

बीड: जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेल्या डोंगरी गावातील भोंडवे कुटुंबाचा नगर पुणे महामार्गावर शिरूर घोडनदीच्या कारेगाव जवळ झालेल्या अपघातात झाला. भोंडवे कुटुंबातील चौघांवर गुरुवारी गुरुकुल परिसरात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसमुदायासमोर या अपघातातून वाचलेले सुदाम भोंडवे यांचे सुपुत्र अश्विन भोंडवे यांनी भावना व्यक्त केल्या. अश्विन यांचे हृदयाला पाझर फोडणारे शब्द ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.मंगळवारी नगर पुणे महामार्गावर शिरूर घोडनदी जवळ भोंडवे कुटुंबाचा अपघात झाला. या अपघातात सुदाम भोंडवे, त्यांची पत्नी सिंधुताई भोंडवे, सून कार्तिकी भोंडवे, नात आनंदी भोंडवे यांचं निधन झालं. त्यांचे पार्थिव बुधवारी डोमरी येथील गुरुकुल परिसरात आणण्यात आलं होतं. गुरुकुलासमोर अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात चारही पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भावनिक आवाहनाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणीकाका आणि आई आपल्या सगळ्यांना सोडून गेले. माझी आनंदीही गेली.... काकांनी दोन गोष्टी दिल्या.. प्रेम आणि खरेपणा.. त्यांनी त्या आयुष्यभर जपल्या. सुदामकाकांनी सुरू केलेले हे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे अविरत सुरू ठेवू... काकांनी दिलेली दोन मूल्ये आपण आत्मसात करून त्यांचे कार्य पुढे नेऊ, असा विश्वास व्यक्त करताना अश्विन भोंडवे यांना अश्रू रोखणं कठीण झालं होतं. एवढ्या दु:खाच्या प्रसंगी अश्विनने केलेल्या भावनिक आवाहनाने उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.बीड जिल्ह्यातील अनेक समाजकार्यातील सुदाम काकांचं मोठं योगदान होतं. भारतासह विदेशातील परिचित रामकाकांनी गुरुकुलचे रोपटं लावलं. त्यांचा वटवृक्ष झाला. एकेकाळी कुडाच्या झोपडीमध्ये त्यांनी हे गुरुकुल चालू केलं. पाहता पाहता त्याचं वटवृक्षात रुपांतर झालं. सगळं काही छान सुरु असताना नियतीची भोंडवे कुटुंबातील चौघांवर वक्रदृष्टी पडली. अंत्यविधीवेळी भोंडवे कुटुंबाचं आणि काकांचं नेमकं अस्तित्व आणि महत्त्व गुरुकुलच्या लेकरांसाठी आणि नागरिकांसाठी काय होतं, हे त्यांच्या अश्रूंनी दाखवून दिलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WDK8sYe

No comments:

Post a Comment