बंगळुरू: बंगळुरूमध्ये गुरुवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. या घटनेत सिमेंटने भरलेला काँक्रीट मिक्सर ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन कारवर उलटला. बन्नेरघाटा मेन रोडवर ही घटना घडली. या अपघातात एक आई आणि तिच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही आई आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात असताना हा अपघात झाला. मृत महिलेचे नाव गायत्री कुमार (वय -४७) आणि मुलीचं नाव समता कुमार (वय १६) आहे. पोलिसांनी सांगितले की, गायत्री आपल्या मुलीला कारमधून शाळेत सोडण्यासाठी जात होत्या तेव्हा हा अपघात झाला. बन्नेरघाटा रोडवर भरधाव वेगात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन या कारवर उलटला आणि हा भीषण अपघात घडला.हेही वाचा -अपघातानंतर गायत्री आणि तिची मुलगी समता कारमध्ये अडकल्या होत्या. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली आणि या आई-मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. मात्र, गाडीवरुन ट्रक काढला तोपर्यंत या आईचा आणि तिच्या मुलीचा मृत्यू झालेला होता. हेही वाचा -मिळालेल्या माहितीनुसार, पलटी झालेला ट्रक गाडीच्या वरुन काढण्यासाठी पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. चार क्रेनच्या सहाय्याने या ट्रकला कारवरुन हटवण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत गायत्री या आयटी क्षेत्रात काम करायच्या. त्या पती सुनील कुमार आणि दोन मुलांसह बंगळुरूमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. नेहमी त्यांचे पतीच मुलीला शाळेत सोडायला जायचे. मात्र, आज आई समताला सोडायला गेल्या होत्या आणि हा अपघात झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.हेही वाचा -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/csTtZhr
No comments:
Post a Comment