Breaking

Sunday, February 26, 2023

ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, त्या योजनेचा मी साक्षीदार; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा https://ift.tt/MK8Ugvd

मुंबई : महाराष्ट्राचे यांनी रविवारी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी भाजप नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या योजनेचा मी साक्षीदार असल्याचे शिंदे म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी हा खळबळजनक दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात सरकारने आपल्याला अटक करण्याची योजना आखल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या योजनेचा मी साक्षीदार होतो. महाजन यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ लावण्याची योजनाही सरकारने आखली. ती योजना रोखण्यासाठी मी काय म्हणालो होतो त्याचा पुनरुच्चार करू शकत नाही.' उद्धव सरकारचा भाजपविरोधात मोठा कट होता : शिंदेमी तो निर्णय तर बदललाच, पण नंतर संपूर्ण सरकार पाडले आणि त्यांना घरी बसवले. भारतीय जनता पक्षाला (अटकेद्वारे) मागे ढकलण्याची योजना होती, असे शिंदे पुढे म्हणाले. सध्याचे सरकार या कटात सहभागी असलेल्यांवर कारवाई का करत नाही, यावर शिंदे म्हणाले की, त्यांना सत्तेतून बेदखल करणे हे पुरेसे आहे. अशा गोष्टींमध्ये कोणाचा सहभाग होता हे मला चांगलेच माहीत आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू करू. अटकेबाबतचा दाव फडणवीस यांनीही केला होतातत्कालीन उद्धव ठाकरे सरकार आपल्याला अटक करण्याचा विचार करत होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनीही केला होता. मात्र, त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला. सध्या फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे, तर महाजन हे राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W32wRDB

No comments:

Post a Comment