Breaking

Wednesday, February 22, 2023

चेतनला पैसे द्याल... इतकं लिहून तरुणाने आयुष्य संपवलं, कारणही तेवढंच धक्कादायक https://ift.tt/RFvNTE4

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर येथे सध्या ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. नशेच्या आहारी जाऊन येथे तरुण आत्महत्याही करत आहेत. असंच एक प्रकरण इंदूरच्या मल्हारगंज पोलीस स्टेशन परिसरात घडलं आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाला ड्रग्ज तस्कर पैशांसाठी त्रास देत होते. त्यामुळे या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.हा तरुण इंदूरमधील मल्हारगंज पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रनगर येथे राहत होता. तो येथे कलर पेंटिंगचे काम करत होताय. राहुल असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या परिसरात राहणारा चेतन नावाचा तरुण राहुलला नशेची पावडर देत असे, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. चेतनने राहुलला वारंवार नशेची पावडर देऊन त्याला व्यसनाधीन बनवले होते. ड्रग्ज देण्याच्या बदल्यात तो राहुलकडून पैसे घेत असे. घटनेच्या दिवशीही राहुल मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. चेतनला पैसे द्यायचे आहेत, असे तो घरच्यांना वारंवार सांगत होता. चेतन घरी पैसे मागण्यासाठी येणार होता.राहुल हा नेहमी घरच्यांकडे पैशांची मागणी करायचा. मात्र, कुटुंबीयांनी त्याला पैसे द्यायला नकार दिला. याचाच राग मनात ठेवत तो वरच्या खोलीत गेला आणि तिथे त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने गळफास लावण्यापूर्वी एक सुसाईड नोटही लिहून ठेवली. यामध्ये त्याने लिहिले की चेतनला ड्रग्जसाठी पैसे द्यायचे आहेत. तो पैशाची मागणी करण्यासाठी घरी येणार आहे. चेतन हा ड्रग्ज विक्रेता पैशांसाठी राहुलचा छळ करत होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या चेतन नावाच्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. चेतन हा ड्रग्ज विकतो आणि त्यानेच राहुलला ड्रग्जचं व्यसन लावलं. त्यानंतर तो राहुलला पैशांसाठी त्रास देत असल्याचा आरोप राहुलच्या घरच्यांनी केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ma6bv2O

No comments:

Post a Comment