Breaking

Tuesday, February 14, 2023

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि लोकसभेच्या २२७ जागा; भाजपकडे आहे २०२४च्या विजयाचा हुकमी एक्का https://ift.tt/TC4c0J3

नवी दिल्ली: हा भारताचा सर्वात मोठा आठ लेन असलेला एक्सप्रेस वे आहे. एक्सप्रेसचा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हा टप्पा दिल्ली ते दौसा दरम्यानचा २४६ किलोमीटरचा आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या आधी हा एक्सप्रेस वे तयार होईल. निवडणुकीच्या वर्षात जर तुम्ही प्रवासाला सुरूवात केली तर १२ तासात सात राज्यातून आणि दोन केंद्र शासित प्रदेशातून १ हजार ३५० किमी इतका प्रवास करू शकाल. या प्रवासात तुम्ही लोकसभेच्या ३६ लोकसभेतून जाल. सात राज्य आणि दमन-दीव, दादर-नगर हवेलीचा समावेश केला तर लोकसभेच्या २२७ जागा होतील. दिल्ली-मुंबईत एक्सप्रेस वे चा २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडणार हे नक्की आहे. थेट आकडेवारीचा विचार करूयात. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर भाजपचे उमेदवार निवडूण आले आहेत आणि एक्सप्रेस वे दिल्लीशी जोडण्याची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ६२ जागा भाजपकडे आहेत. यावेळीचे टार्गेट ८० पैकी ८० आहे. हरियाणामध्ये भाजपने १० पैकी १० जागा जिंकल्या होत्या. राजस्थानमध्ये २५ पैकी २५ जागा तर गुजरातमधील २६ च्या २६ जागांवर विजय मिळवला होता. मध्य प्रदेशमध्ये २९ पैकी २८ जागा तर महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागा भाजप आणि शिवसेनेने जिंकल्या होत्या. तेव्हा शिवसेनेत फुट पडली नव्हती. लोकसभेच्या ज्या २२७ जागांवर एक्सप्रेस वे मुळे फरक पडणार आहे. तेथे आधीपासून भाजपचा प्रभाव आहे. २२७ पैकी फक्त २६ जागांवर भाजपचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये २२७ पैकी २०१ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. ही कामगिरी पुन्हा करण्यासाठी भाजपला मोदी मॅजिकची गरज लागले. लोकांना वाटले पाहिजे की ते शानदार काम करत आहेत. राजस्थानमध्ये सचिन पायलट-अशोक गहलोत यांच्या वादात विधानसभा निवडणुक होणार आहे. गुजरातमध्ये भाजपने विजय मिळवला पण अरविंद केजरीवाल यांनी १३ टक्के मतं घेतली. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान आहेतच. महाराष्ट्रात शिवसेनेत दोन गट झालेत. प्रशांत किशोर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर बिहार, बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमधील १५० जागांवर भाजप कुठेच नाही. २०२४ मध्ये यात फार काही बदल होणार नाही. पण उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात अशी स्थिती नाही. पंजाब आणि राजस्थानमध्ये तर भाजपची सत्ता देखील नाही. पण हा एक्सप्रेस वे चा परिसर आहे. किशोर यांच्या मते एक्सप्रेस वे च्या मार्गात हेणाऱ्या राज्यातील ८० ते १०० जागांवर विरोधक एकत्र आले आणि त्यांनी भाजपचा पराभव केला तर देशाचे राजकीय चित्र बदलेल. यामुळेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा विजयाचा हुकमी एक्का ठरू शकतो. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पूर्णपणे खुला झाल्यानतंर प्रत्येक वर्षी ३० कोटी लीटर इंधन बचत होईल. ८० कोटी किलो कार्बनडायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल. सध्या दिल्ली ते जयपूर हा १२० किलोमीटरचे अंतर फक्त प्रवासाचा आनंद देणार नाही तर आर्थिक विकासाला चालना देणारा ठरू शकतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1nPWjqg

No comments:

Post a Comment