Breaking

Sunday, February 19, 2023

तू माझ्यासाठी काय करु शकते, पत्नी म्हणाली जीवही देऊ शकते; मग त्याने तिच्याच ओढणीने... https://ift.tt/uDFh4PY

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका पतीने पत्नीला एक प्रश्न विचारला. त्याने विचारलं की तु प्रेमात माझ्यासाठी काय करु शकते. यावर त्याची पत्नी म्हणाली की मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकते. हे ऐकल्यानंतर निर्दयी पतीने खरंच पत्नीचा जीव घेतला. मात्र, त्याचा हा गुन्हा फार का पोलिसांनी आता या घटनेचा खुलासा करत आरोपी डॉक्टरला तुरुंगात पाठवले आहे.मेहुणीसोबत प्रेमसंबंधात पत्नी अडसरया खळबळजनक घटनेबाबत सांगताना बरेलीचे एसएसपी अखिलेश कुमार चौरसिया यांनी सांगितले की, मोहम्मद फारुख आलम यांचे बिथरी चैनपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात क्लिनिक आहे. येथे तो रुग्णांवर उपचार करत असे. त्याचे त्याच्या मेहुणीसोबतच प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते. पण, पत्नी नसरीनमुळे त्यांचे लग्न होऊ शकत नव्हते. त्यामुळे त्याने पत्नीचा काटा काढण्याचा कट रचला. पत्नीच्या ओढणीनेच तिचा गळा आवळलाएसएसपी अखिलेश कुमार चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशीत फारुखने सांगितले की, त्याने रात्री नसरीनला विचारलं, 'तुझे माझ्यावर किती प्रेम आहे?' यावर तिने उत्तर दिले की मी तुझ्यासाठी माझा जीवही देईन. यानंतर त्याने पत्नीच्या ओढणीने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नसरीनला वाटले की तो मस्करी करतोय. मात्र, फारुख खरंच तिचा जीव घेतला. त्याने तिच्या पोटातही चाकूने वार केला. सर्वांपुढे मांडली दरोड्याची कहाणीत्यानंतर त्याने स्वत:च्या डोक्यालाही दुखापत करुन घेतली आणि सर्वांपुढे दरोड्याची कहाणी मांडली. ही दरोड्याची कहाणी वाटावी म्हणून त्याने घरातील सामानही त्याप्रकारे विखुरलं. जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली तेव्हा पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुर केला. यादरम्यान, आयपीएस चंद्रकांत मीणा यांना फारुखच्या बोलण्यात विरोधाभास आढळून आला. त्यानंतर त्यांनी कठोरपणे चौकशी सुरू केली आणि अखेर सत्य समोर आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WOLPJN8

No comments:

Post a Comment