Breaking

Saturday, February 25, 2023

भारतीय खेळाडूच ठरू शकतो तिसऱ्या कसोटीतील संघाच्या पराभवाला जबाबदार; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला सांगितली ही गोष्ट https://ift.tt/VfB9S0N

इंदूर: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी १ मार्चपासून इंदूर येथे खेळायची आहे. मालिकेत भारतीय संघ २-०ने आघाडीवर आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडाली होती. पण आता इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या आधी एक मोठी अपडेट आली आहे, ही अपडेट टीम इंडियासाठी निश्चित आनंदाची नाही. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना संधी दिली नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने टीम इंडियाला दिल्ली कसोटीत इशारा दिला होता. तोच खेळाडू आता तिसऱ्या कसोटीत घातक ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या संघातील मधळ्या फळीत खेळणारा पीटर हॅड्सकॉम्बने दिल्लीत नाबाद ७२ धावांची खेळी केली होती. तिसऱ्या कसोटीच्या आधी पीटरने अशी एक माहिती दिली आहे ज्यामुळे भारतीय गटात काळजीचे वातावरण तयार झाले आहे. पीटरने सांगितले की, "फिरकी गोलंदाजांविरुद्ध कशी फलंदाजी करायची हे मला भारताचा स्टार कसोटीपटू अजिंक्य रहाणेकडून शिकण्यास मिळाले. यामुळेच दिल्ली कसोटीत १४२ चेंडूत ७२ धावा करता आल्या. आता इंदूर कसोटीत पीटर धमाका करू शकतो".पीटर हॅड्सकॉम्बने भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेसोबत फिरकी फलंदाजांना कसे सामोरे जायचे याची चर्चा केली होती. अजिंक्यने त्याला भारतीय उपखंडात फिरकीला कसे सामोरे जायचे याचे धडे दिले होते. पीटर आणि अजिंक्य २०१६ साली आयपीएलमध्ये एकत्र खेळले होते. तेव्हा अजिंक्यने त्याला फिरकीला खेळताना पाय आणि मनगटचा कसा वापर करायचा हे सांगितले होते. सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना पीटर म्हणाला, "अजिंक्य फिरकी गोलंदाजांना ज्या पद्धतीने खेळत होता ते पाहून मला अश्चर्य वाटले. अशा पद्धतीने फलंदाजी करण्याचे कौशल्य मला देखील शिकायचे होते. यावर मी त्याच्याशी चर्चा केली होती".बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताने नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवाल होता. त्यानंतर दिल्ली कसोटीत ७ विकेटनी विजय मिळवात मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. आता इंदूर कसोटीत विजय मिळवून भारताला WTCच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी आहे. त्याच बरोबर भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचू शकतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OINqt0Z

No comments:

Post a Comment