नागपूर : रोहित शर्माने पहिल्या कसोटीत धडाकेबाज फटकेबाजी करत दमदार शतक झळकावले. या सामन्यात पहिले शतक झळकावण्याचा मान रोहितला मिळाला. पण रोहितच्या या शतकानंतर त्याची पत्नी रितिका सचदेहने एक अनोखी मागणी केली आहे. रितिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे.रोहितच्या शतकानंतर रितिकाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या इंस्टाग्रामवर रोहित आणि रितिका यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर रितिकाने रोहितकडे नेमकी कोणती मागणी केली आहे ते त्यांनी लिहिले आहे. रितिकाने यावेळी रोहितला म्हटले आहे की, " रोहित माझे तुझ्यावर प्रेम आहे. पण मला प्लीझ तु रिप्लेसमेंट फिंगर्स पाठव." कारण जेव्हा रोहित शतकं झळकावण्याच्या समीप येतो तेव्हा रितिका 'फिंगर क्रॉस' करत असते. त्यामुळे आता बऱ्याचदा रितिकाने असं केलं आहे आणि यापुढे किती वेळा करावं लागणार हेदेखील माहिती नाही. त्यामुळे रितिकाने गंमत म्हणून अशी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.नागपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची पडझड सुरु होती. अश्विन बाद झाला आणि त्यानंतर भारताला चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या रुपात एकामागून एक धक्के बसत होते. पण भारताने हे सर्व धक्के पचवले ते फक्त आणि फक्त रोहित शर्मामुळे. कारण रोहित त्यावेळी खेळपट्टीवर उभा राहीला आणि त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. त्यामुळेच भारताला दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारता आली. रोहितने यावेळी १२० धावांची खेळी साकारली. रोहितच्या या शतकानंतर आता रितिकाने एक वेगळीच मान्य केली आहे. रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाबरोबरचे हे पहिले कसोटी शतक आहे. त्याचबरोबर कर्णधार असताना त्याने हे विक्रमी शतक झळकावले आहे. त्यामुळे आता या महत्वाच्या मालिकेत रोहित यापुढे कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VTx1tsv
No comments:
Post a Comment