मुंबई: देवळाली विधानसभेच्या विद्यमान या आपल्या ५ महिन्यांच्या बाळाला घेऊन आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर झाल्या होत्या. हिवाळी अधिवेशना दरम्यान आरोग्य विभागातर्फे नागपूर येथे हिरकणी कक्ष सुरू केला होता. या कक्षात बाळाची देखभाल करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि आया अशा सर्व सुविधा उपलब्ध होत्या. मात्र, आज विधानभवनातील हिरकणी कक्षात बाळाची गैरसोय झाली. त्यानंतर सरोज अहिरे यांनी याबाबत तक्रार दिली. तसेच, प्रसार माध्यमांपुढे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या बाळाचे झालेले हाल त्यांना बघवले नाही आणि त्या अधिवेशन अर्ध्यावर सोडून निघून गेल्या.दरम्यान, सरोज अहिरे यांनी या संदर्भातील निवेदन प्रधान सचिव यांच्याकडे दिले होते. आज त्या आल्या असता त्यांना उपलब्ध करून दिलेला हिरकणी कक्ष हा सुविधांपासून वंचित होता. याची तक्रार करत सरोज अहिरे यांनी माध्यमांमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी केली. एक लोकप्रतिनिधी म्हणून सरोज अहिरे अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत, दरम्यान एक आई म्हणून होणाऱ्या असुविधेबद्दल त्यांनी तक्रार कली आहे. ही तक्रार सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कानावर जाताच त्यांनी सरोज ताई यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला आणि त्यांना येत्या २४ तासांच्या आत आया, नर्स, डॉक्टरसह सुसज्ज असा हिरकणी कक्ष तयार असेल याची ग्वाही दिली. आपल्या मतदारसंघाप्रती असणाऱ्या आपल्या बांधिलकीचे कर्तव्य बजावण्यासाठी अधिवेशनात आलेल्या आमदार सरोज अहिरे यांच्या बद्दल आदर व्यक्त करून मंत्री सावंत यांनी दाखवलेली संवेदनशिलता आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आमदार सरोजताई आणि चिमुकल्या बाळाला कुठल्याही असुविधेला तोंड द्यावे लागणार नाही या संदर्भातील सूचना मंत्री सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कर्तव्यतत्पर आईसाठी कर्तव्यतत्पर मंत्री धावून आले याची चर्चा आज विधीमंडळ परिसरात होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eDYw8S
No comments:
Post a Comment