Breaking

Wednesday, February 15, 2023

लॉजमध्ये भलतंच काम सुरु, खबऱ्याने खबर दिली; पोलिसांनी धाड टाकली अन्... https://ift.tt/zdfvJIM

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात धाड सत्र सुरुच असून अनैतिक देह व्यापार चालणाऱ्या लॉजची खबऱ्याने खबर पक्की खबर दिली. याआधारे पोलिसांनी दोन लॉजवर धाड टाकली अन् धाडीत ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आसून त्यांना ताब्यात घेतलं आहे. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन एम. रमेश, सह. पोलीस अधीक्षक उप विभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविद्रं गायकवाड पोलीस ठाणे कळंब, पोलीस उप निरीक्षक श्रीमती वर्षा साबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळंब शहरातील शिवप्रसाद लॉजमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या कुंटणखाना चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन डमी ग्राहक यांना सदर ठिकाणी पाठवून खात्री केली. तेव्हा सदर ठिकाणी कुंटणखाना चालू असल्याचे दिसून आलं. पोलिसांनी या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास छापा मारला तेव्हा तिथे कुंटणखाना चालविणारा गोविंद श्रीमंत अप्पा लोखंडे, बाबु श्रीमंत अप्पा लोखंडे, ग्राहक इसम बिलाल शेख नुर बागवान आणि ज्ञानेश्वर भाउराव होनमाने, संतोष प्रकास लिके (वय ३५ वर्षे रा खरडा), विजय सुभाष इगंळे (वय ३२ वर्षे रा वाकुद, ता.जामनेर), असे एकुण ६ जण मिळून आले. सदर ठिकाणाहून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. सदर व्यक्तींविरुध्द कळंब पोलीस ठाण्यात कलम ३७०, ३७० अ (२), ३४ सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५ अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण हद्दीमध्ये मयुरेश हॉटेल लॉज ॲन्ड बार याच्या जवळ चालत असल्याची माहिती मिळाली. तिथे एक डमी ग्राहक यांना सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री झाल्यानंतर पाहाटेच्या सुमारास छापा मारला. तिथे पीडित महिला मिळून आली.तिच्या सांगण्यावरून रंजित रघुनाथ भोसले, गौरी लोकनाट्या कला केंद्र वडगाव येथील पार्टी मालकीनने येडशी उड्डाणपुलाजवळ उस्मानाबाद ते बीड जाणारे रोडलगत मयुरेश हॉटेल लॉज ॲन्ड बार मालक नानासाहेब तानाजी पवार, लॉजचालक रंजित रघुनाथ भोसले, प्रदिप त्रिंबक मुंढे, मनोज काकडे यांनी संगणमत करून पैशांसाठी लॉजवर वेश्याव्यवसायासाठी रुम उपलब्ध करुन दिल्या. यानंतर पोलिसांना महिलांची सुटका करुन लॉज चालक- मालक नानासाहेब तानाजी पवार यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/blyJZrj

No comments:

Post a Comment