: कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांचे मोबाईल, दागिने चोरणाऱ्या डहाणू येथील एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची सोन्याचा ऐवज असलेली पिशवी चोरणाऱ्या चोरट्याचा शोध घेताना डहाणु मधील चोरटाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अहमदाबाद - कोल्हापूर एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्स मधून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. डहाणू येथे राहणाऱ्या सुभान अहमद जहीर अहमद (४१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी महिला या अहमदाबाद- कोल्हापूर एक्स्प्रेस या गाडीने प्रवास करत होत्या. मध्यरात्र उलटून गेली होती. प्रवासादरम्यान त्या झोपलेल्या असताना मध्यरात्री २ ते ४ या वेळेत सुरत ते भिवंडी या स्थानक दरम्यान आरोपीने हा फिर्यादी महिलेजवळ आहे. त्यानंतर यांच्याजवळ असणाऱ्या पर्समधून या चोरट्याने किमती ऐवज चोरून नेला. आपला किमती मुद्देमाल चोरी गेल्याचे या महिलेला समजले आणि तिला धक्का बसला. या महिलेने ताबडतोब लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत, तपास चालू केला आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारा शोध घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपी भायखळा भागात असल्याची मिळाली माहितीरेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना पथकाला वसई रोड स्थानकाबाहेर महिलेची पिशवी घेऊन एक इसम बाहेर पडत असल्याचे दिसले. तो इसम भायखळा भागात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला या भागातून सापळा लावला आणि त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. त्याची चौकशी केल्यावर त्याने अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये एका महिलेची सोन्याची दागिने असलेली पिशवी चोरल्याची कबुली दिली. याशिवाय कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये तीन मोबाईल चोरीचे गुन्हे केले आहेत, याची कबुली दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/b3hqMNE
No comments:
Post a Comment