टाइम्स वृत्त, नवी दिल्ली हल्लीची युवा पिढी स्वप्ने बघणारी, ती सत्यात आणणारी आहे, अशा शब्दांत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी युवकांशी संवाद साधला. टाइम्स लिटरेचर फेस्टिवलचे उद्घाटन केल्यानंतर ते शनिवारी बोलत होते. जगात काय घडते आहे, त्याची तुम्हाला माहिती आहे. युरोप, जपान, अमेरिकेसारख्याच सर्वोत्तम गोष्टी तुम्हाला हव्या असतात, असे सांगतानाच त्यांनी ‘वंदे भारत रेल्वे’चे उदाहरण दिले. सिरी फोर्ट सभागृहात रंगलेल्या या महोत्सवात वैष्णव यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यात सोशल मीडियाची क्रेझ, आवडीनिवडी आदी अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला. त्यांच्या भाषणाला टाळ्या वाजवून युवकांनी प्रतिसाद दिला. मी स्वत: विज्ञान आणि अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी साहित्याची पुस्तकेही मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, नव्या पिढीसाठी आम्ही पाया तयार करीत आहोत, जो तुमचे करिअर, जीवन पुढे घेऊन जाईल. त्यातून आपल्याला विकसित देशात राहण्याची संधी मिळेल आणि देश विकसित करण्याची संधी मिळेल. ‘वंदे भारत रेल्वे’ १८० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. इतका वेग असूनही त्यात ठेवलेला पाण्याचा ग्लासही सांगणार नाही. देशातील विकासाचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी विज्ञानाचा आधार घेण्यात आला आहे. ‘वंदे भारत’ ही सत्यकथा आहे, भास नव्हे रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, ‘वंदे भारत रेल्वे’ची महती मुद्दाम सांगत आहे. त्यातून तुम्हा सर्वांना हे लक्षात यावे की, उद्याच्या पिढीसाठी काय काय तयारी केली जात आहे. हा भास नव्हे तर, सत्यकथा आहे. देशाचा पाया अधिक सशक्त करण्याची मनोवृत्ती त्यामागे आहे. नवनवी आव्हाने स्वीकारण्याची जिगर त्यामागे आहे. उद्दीष्टे पूर्ण करण्याची जिगर त्यामागे आहे. रेल्वेची यशकथा सांगताना वैष्णव म्हणाले की, रेल्वे हे जगातले सर्वांत गुंतागुंतीचे यंत्र आहे. एका वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १८० किलोमीटर प्रति तासाने रेल्वे चालविणे मोठे आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७मध्ये रेल्वेच्या पथकाला जागतिक श्रेणीची रेल्वे तयार करण्याचे लक्ष्य दिले होते. ‘देशातील माझे अभियंते, तंत्रज्ञ, वेल्डर, इलेक्ट्रिशियन या रेल्वेचा आराखडा तयार करतील आणि ती जागतिक श्रेणीची होऊन जगाला भुरळ पाडेल,’ असा विश्वास मोदी यांनी तेव्हा व्यक्त केला होता. या रेल्वेचे काम २०१७मध्ये सुरू झाले. अनेक संकटे आली मात्र, २०१९मध्ये पहिली वंदे भारत रेल्वे रूळावर आली. रेल्वे निर्मिती करणाऱ्या जगभरातील उद्योगांनी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्यासाठी पाया तयार करायचा असल्याने आम्ही हिंमत हारलो नाही. आम्ही नव्या रेल्वेची चाचणी केली. जो बदल करायचा होता, तो केला. विश्वाच्या परिघाइतक्या १८ फेऱ्या या रेल्वेने केल्या आणि चाचणी पूर्ण झाली. ‘जेव्हा तुम्ही ७, ८, ९, १० ‘सीजीपीए’ श्रेणी मिळवता तेव्हा तुमचे पालक काय म्हणतात? ते आणखी गुण का नाही मिळविले असे विचारतात की नाही. आमचे ‘बॉस’ही असेच आहेत. ही रेल्वे चांगली आहे. ती अधिक उत्तम करा, असे मोदींनी आम्हाला सांगितले आहे. युरोपात रेल्वे आराखड्याचे परिमाण असते ‘टॉलरन्स’, ‘मार्जिन ऑफ एरर’, तिकडे ते तीन मिलिमीटर आहे ते आपल्याला एक मिमीने कमी करायचे आहे. त्याचा परिणाम असा झाला की, या रेल्वेत हादरे नाहीत आणि ध्वनी पातळी विमानापेक्षा १०० पट कमी आहे. गणिताच्या तासाला जशी शांतता असते तशी शांतता असते या रेल्वेत, ’ अशा शब्दांत वैष्णव समजावून सांगत होते आणि उपस्थित युवावर्ग टाळ्यांनी त्यांना दाद देत होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Sk0TMD3
No comments:
Post a Comment