Breaking

Saturday, February 11, 2023

‘टाइम्स लिटरेचर फेस्ट’ला दिल्लीत शानदार प्रारंभ, समीर जैन म्हणाले, कोट्यवधी वाचकांपर्यंत साहित्य पोहोचविण्याचा प्रयत्न https://ift.tt/6AjX5nq

टाइम्स वृत्त, नवी दिल्ली उत्तम साहित्याची रेलचेल आणि ख्यातनाम साहित्यिकांच्या उपस्थितीत येथे शनिवारी ‘टाइम्स लिटरेचर फेस्टिव्हल’ला प्रारंभ झाला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ‘टाइम्स लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून आम्ही वृत्तपत्रातील साहित्य कोट्यवधी वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहोत; कारण अनेक लोक पुस्तके वाचत नाहीत. या महोत्सवातील घडामोडींचे वार्तांकन वृत्तपत्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोविण्यात येईल,’ अशी भूमिका या वेळी ‘टाइम्स ग्रुप’चे व्हाइस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) यांनी स्वागतपर भाषणात मांडली. ‘टाइम्स लिटरेचर फेस्टिव्हल’च्या लोगोचे अनावरण वैष्णव, ‘टाइम्स ग्रुप’चे व्हाइस चेअरमन आणि एमडी समीर जैन, ‘डीएस ग्रुप’चे संचालक अतुल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वैष्णव यांनी फेस्टमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना, ‘विज्ञानाबरोबरच साहित्याची आवड जोपासावी,’ असे आवाहन केले. ‘वंदे भारत’ ट्रेनचे उदाहरण देऊन वैष्णव म्हणाले, ‘भावी पिढ्यांसाठी असा पाया रचला जात आहे, की तुम्ही करिअरमध्ये आणि आयुष्यात प्रगती साधावी. भविष्यात तुम्हाला विकसित देशात राहण्याची संधी मिळेल.’ ‘टाइम्स लिटरेचर फेस्टिव्हल’च्या उद्घाटनपर भाषणात बोलताना ‘डीएस ग्रुप’चे बिझनेस हेड सी. के. शर्मा म्हणाले, ‘आम्ही टाइम्स लिटरेचर फेस्टिव्हलच्या सुरुवातीपासूनच या महोत्सवाशी जोडले गेलो आहोत. साहित्य माणसामध्ये प्रेम, यश, कौटुंबिक, बौद्धिक, संपन्नतेची आकांक्षा जागवते, साहित्य हे मानवी सर्जनशीलतेची अभिव्यक्ती आहे. या वर्षीच्या टाइम्स लिटरेचर फेस्टिव्हलची थीम ‘एक जग, अनेक शब्द,’ अशी आहे. त्यातून अनेक कल्पना, अनेक विचार, अनेक विचार एकत्र येऊन एक संवाद घडतो हे दिसून येते. सी. एस. लुईस यांनी म्हटले आहे, की साहित्य वस्तुस्थितीविषयी केवळ भाष्य करून थांबत नाही, तर त्यामध्ये अधिक भर घालते. आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या गुणांचा परिपोष करण्याचे काम साहित्य करते. आपल्या जीवनाचा भाग बनलेल्या रूक्षतेवर शिंपण करण्याचे काम साहित्य करते.’ फेस्टच्या पहिल्या दिवशी ‘व्हाय फेअर अ रिलिजियस नेशन?’ याविषयावरील परिसंवादाचा अनुभव उपस्थितांनी घेतला. यामध्ये आर. जगन्नाथ, अश्विन संघी, पवन वर्मा, सुधींद्र कुलकर्णी सहभागी झाले होते. ‘इज अ गुड टाइम टु बी क्वीअर इन इंडिया,’ ‘हाउ मच मायथॉलॉजी इज पार्ट ऑफ हिस्टरी,’ ‘चेंजिंग फेस ऑफ बुक्स’ आणि इतर अनेक मुद्द्यांवरही या फेस्टमध्ये चर्चा झाली. ‘यू कॅन अचीव्ह मोअर’ या सत्रात शिव खेरा, ‘काश्मीर फाइल्स मॅटर’ या विषयावर विवेक अग्निहोत्री यांचे विचार ऐकण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळाली. ‘टाइम्स लिट फेस्ट’मध्ये आज परिसंवाद - ‘डोगलपन’ - सहभाग- अश्नीर ग्रोव्हर चर्चासत्र - ‘टोम्ब ऑफ सँड’- सहभाग- इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड विजेत्या गीतांजली श्रीचर्चासत्र - ‘अ कंट्री कॉल्ड चाइल्डहूड’- सहभाग- दीप्ती नवल


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YFulhdQ

No comments:

Post a Comment