Breaking

Sunday, March 12, 2023

CM म्हणजे करप्ट माणूस, हे सरकार घोटाळेबाज; शिवगर्जना सभेतून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल https://ift.tt/xZAifg3

मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते यांनी गोरेगावातील शिवगर्जना सभेत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सीएम याचा अर्थ आता नवीन लावला जाणार आहे. सीएम म्हणजे 'करप्ट माणूस' अशी ओळख निर्माण झाली आहे. हे सरकार संविधान बदलणार सरकार आहे त्यामुळे सावध होणं गरजेचे आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सीएम या शब्दाच्या आधारे अप्रत्यक्षपमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.या मुख्यमंत्र्यांची खुर्ची लवकरच जाणार- ठाकरेया अंधारात देखील आपल्या हातात एक वेगळे शस्त्र आले, ते म्हणजे मशाल. आपल्या सभेला गर्दी होते, त्यांच्या सभेला सर्व आहे, लाल पिवळा, निळा पण फक्त खुर्च्यांची गर्दी तिथे होते. आज आपण जेवढ्या खुर्च्या लावल्या त्या वाढवाव्या लागल्या, कारण जास्त कार्यकर्ते आले. ३३ देशांमध्ये जिथे तिथे गद्दारांची यांची नोंद घेतली गेली, त्यांना हे पटलं नाहीये, सर्व सर्व्हे मधून हेच पुढे येतेय, असे सांगताना या मुख्यमंत्र्यांची खुर्ची लवकरच जाणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांना १ रुपयाही पोहोचला नाही- ठाकरेशिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, '५० ओके एकदम ओके या घोषणा त्यांना झोंबायचे तिथे बरोबर झोंबत आहेत. गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, अजून शेतकऱ्यांना एक रुपया देखील पोचला नाही. आपण कर्जमुक्तीची वचन दिली होती, ती पूर्ण करून दाखवली. आज शेतकरी सांगतात की, उध्दव ठाकरे यांनी दिलेली कर्ज मुक्ती मिळाली. या सरकारचे काही मिळाले नाही अजून.' दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानच बदलून टाकले- ठाकरे आज दुसरे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करत होते. त्यांनी पंतप्रधानच बदलून टाकले. कदाचित त्यांना आता वाटत असेल परत गुवाहाटी इथे जाऊन पंतप्रधान बदलावे. पन्नास खोके बोलले की कधी म्हणत नाहीत की आम्ही नाही घेतले. विधानसभेत हळूच येऊन विचारतात साहेब आम्हाला घेतील का. मी सांगतो की तुम्ही आता येऊच नका, असे सांगत हे सगळं भाजपला कसं काय सहन होत आहे असा सवाल ठाकरे यांनी विचारला. येणाऱ्या २५ वर्षांतही मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता असेल- ठाकरे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, 'फेब्रुवारी- मार्च मध्ये उष्णता वाढली, मे मध्ये काय हाल होतील ते कळणार पण नाही, आम्ही यावर काम करत होतो, शेतकरी सांगतात आमच्या पुढच्या पिढीने शेतकरी होऊ नये, मग आपण खाणार काय?आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी Davos इथे जाऊन फक्त २८ तास राहिले आणि ४० कोटी खर्च केले. कोणी ठरवून पण हे करू शकणार नाही. एमएसआरडीसी रस्त्यावर आता ४ टोल लावण्यात आले आहेत. आजपर्यंत या मुंबईवर २५ वर्षं शिवसेनेची सत्ता आहे आणि येणाऱ्या २५ वर्षात देखील शिवसेनेचीच सत्ता राहणार आहे.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2pUSamw

No comments:

Post a Comment