Breaking

Sunday, March 12, 2023

स्टंट भारी! हात सोडून बुलेट चालवली, हातात पिस्तूल, रिल्स बनवणाऱ्या नगरसेवकपुत्रावर गुन्हा दाखल https://ift.tt/7KiD3eT

सोलापूर : रंगपंचमी हा सण सोलापूरकर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला. नागरिकांनी रंग खेळतानाचे अनेक रिल्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांनी काही रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहेत. मात्र या रिल्समुळे आता अडचण निर्माण झाली आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्तूल घेऊन हे रिल्स तयार करण्यात आले आहेत. हे रिल्स सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सचिन शिंदे यांनी नगरसेवकपुत्रांविरोधात याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार रिल्स तयार करणाऱ्यावर भा.द.वि. ५०५, २७९ व भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पिस्तूल जप्त होणारसलगर वस्ती पोलीस सोशल मीडियावर वायरल झालेल्या रिल्समुळे सतर्क झाले आहेत. रिल्स तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दोघांना बोलावून त्यांची पिस्तूल जप्त केली जाणार आहे. ती पिस्तूल खरी आहे का याची शहानिशा केली जाणार आहे. खरी पिस्तूल असेल तर, ती जप्त करून शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली जाणार आहे. ती तलवार तर लाकडी निष्पन्न झाली, आता पिस्तूलाबाबत काय होईल ?हिंदू जनगर्जना मोर्चात हातात तलवार घेऊन हवेत फिरवल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे महेश कोठे यांचे पुत्र, प्रथमेश कोठे याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस तपासात ती तलवार लाकडी आहे असे निष्पन्न झाले आहे. पण हिंदू गर्जना मोर्चात मोठा पोलीस फौजफाटा तैनात असताना तलवार हवेत फिरवण्यात आली होती. त्याचवेळी तलवार जप्त करून त्याची शहानिशा करण्यास पोलिसांनी दिरंगाई केली होती. गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसांनी वाट पाहून मग शहानिशा केली. आता नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड यांची पिस्तूल जप्त करून शहानिशा केली जाणार. परदेशातील अनेक लायटर हे पिस्तूलासारखेच असतात. आता हे खरे पिस्तूल होती की ते पिस्तुलाच्या आकाराची लायटर होते, असा तर्क अनेकजण लावत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Sd7ZGEv

No comments:

Post a Comment