: कोण कोणत्या गोष्टीचा राग कसा काढेल याचा विचार देखील आपण करू शकत नाही. असाच एक प्रकार तळेगाव दाभाडे येथून समोर आला आहे. मोबाईलचे हप्ते का भरत नाहीस असे विचारल्याने तिघांनी एका व्यक्तीवर केल्याची घटना समोर आली आहे. तसेच या तिघांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर येथे हा प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.मयूर अंकुश मते ( वय २१), स्वप्नील उर्फ मोन्या आनंद जाधव ( वय ), गणेश ऊर्फ सौरभ आनंद जाधव ( वय २२) यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला असून या प्रकरणी. विशाल नंदकिशोर खंदारे ( वय २४) यांनी फिर्याद दिली आहे. यातील मयूर मते आणि गणेश जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी मयूर मते याने फिर्यादी खंदारे यांच्या नावावर हप्त्याने मोबाईल घेतला. मात्र मयूर याने मोबाईलचे हप्ते भरले नाहीत. तू हप्ते का भरले नाहीस असे फिर्यादी याने मयूर याला विचारले. या गोष्टीचा मयूर याला राग आला. तो राग मनात ठेवून मयूर याने आपल्या दोन साथीदारासह फिर्यादीला शिवीगाळ केली. मी हप्ते भरणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फिर्यादी जखमी होऊन खाली पडले असताना देखील आरोपीने कोयत्याच्या मागच्या बाजूने पुन्हा वार केले . त्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने नागरिकांत काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7BQKWsb
No comments:
Post a Comment