सातारा: 'सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय, सगळीकडून मी अडकत चाललो आहे', थोरल्या भावाला मेसेज करून धाकट्याने आत्महत्या केली आहे. महाबळेश्वर येथे ही धक्कादायक घटना घडली असून बुधवारी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. किरण दत्तात्रय शिंगरे (वय २२, रा. मेटतळे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री भावाला मेसेज केला अन् मगमहाबळेश्वर पोलिसांनी सांगितल की, महाबळेश्वर शहरापासून जवळच सहा किलोमीटरवर मेटतळे गाव आहे. या गावातील गणेश दत्तात्रय शिंगरे (वय ३२) याचा लहान भाऊ किरण शिंगरे हा काम नसल्यामुळे घरीच असायचा. मंगळवारी रात्री नऊ वाजता किरण हा त्याच्या खोलीत नेहमीप्रमाणे झोपायला गेला. त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये त्याचा मोठा भाऊ गणेश हा देखील झोपण्यास गेला. सकाळी सहा वाजता गणेशला जाग आली तेव्हा त्याने व्हॉट्सॲप पाहिले असता त्याच्या लहान भाऊ किरणने त्याला मेसेज पाठविल्याचे दिसले. हा मेसेज किरणने रात्री पावणेबारा वाजता गणेश याच्या व्हॉट्सॲपवर पाठविला होता. सगळीकडून मी अडकत चाललो आहे, किरणचा मेसेजमेसेजमध्ये लिहिलं होतं, 'सॉरी दादा, मी या आयुष्याला वैतागलोय. सगळीकडून मी अडकत चाललो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको. हा मेसेज कोणाला दाखवू नको. डीलीट कर. पप्पांना सॉरी सांग. मी मोबाइल ॲपवरून ऑनलाइन लोन घेतलेले असून, ते मला फेडता येत नाही. ते सकाळी अकरा वाजायच्या आत भरून टाक. माझी शपथ आहे. कोणाला सांगू नको. मिस यू'.मेसेज पाहून मोठा भाऊ घाबरलाहा मेसेज पाहून गणेश घाबरून गेला. त्याने किरणच्या रूमकडे धाव घेत त्याला हाक मारत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, किरणने दरवाजा आतून बंद केला असल्याने त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गणेशने आरडाओरड करत घरातील सर्वांना हाक मारली. त्याचक्षणी सगळेजण झोपेतून जागे झाले. व्हॉट्सॲपवरील मेसेज त्याने सर्वांना दाखविला. सर्वांनी मिळून किरणच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आतून बंद केला असल्याने उघडत नव्हता, म्हणून सर्वांनी मिळून तो दरवाजा तोडला. खोलीचं दार तोडून पाहताच कुटुंबीय हादरलेत्याच्या खोलीत सर्वांनी प्रवेश केला असता घरातील अँगलला नायलॉनच्या रस्सीने किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर गणेश आणि त्याच्या शेजारच्या लोकांनी घरातील कोयत्याच्या सहाय्याने गळफासाची दोरी कापून त्याला खाली उतरवले. किरणला महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. किरणच्या मृतदेहाचे दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी सहा वाजता मेटतळे गावात अत्यंत शोकाकूल वातावरणात किरणवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xfY3Dog
No comments:
Post a Comment