Breaking

Sunday, March 19, 2023

मध्यरात्री घरात घुसले, महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण https://ift.tt/mdBYr2H

सातारा : सातारा शहरातील इंदिरानगर, विलासपूर येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरात घुसून दहशत माजवत महिलेला चाकूचा धाक दाखवून केली. चोरट्याने १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरला. या घडलेल्‍या घटनेने कुटुंबीय हादरुन गेले आहे. दरम्‍यान, सातारा शहरात ही घटना घडल्‍याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.उषा राजेंद्रकुमार तोरणे (वय ३५, रा. विलासपूर ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तीन अनोळखी विरुध्द तक्रार दिली आहे.पोलिसांनी सांगितले, की ही घटना दिनांक १७ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली आहे. तक्रारदार तोरणे कुटुंबीय रात्री साडेअकरा वाजता जेवण करुन झोपी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरवाजाचा आवाज आल्‍याने तोरणे कुटुंबीय जागे झाले. यावेळी एक चोरटा खिडकीतून दरवाजाची कडी काढून घरात आला. या घटनेने तोरणे कुटुंबीय हादरुन गेेले व गोंधळ झाला. यावेळी आणखी एक चोरटा घरात आला व तिसरा बाहेर थांबलेला होता. एका चोरट्याने धारदार चाकू काढून त्‍याने दहशत माजवली. १० मिनिटे सुरू होता थरारचाकूचा धाक दाखवून चोरट्याने कपाटाची किल्‍ली मागितली असता ती नसल्‍याचे सांगताच तक्रारदार व त्‍यांच्या मुलीला चोरट्याने ढकलून दिले. घरातील कपाटाकडे जावून त्‍यातील रोख १८ हजार रुपये व पैंजण असा मुद्देमाल जबरदस्‍तीने चोरुन नेला. सुमारे १० मिनिटे हा थरार सुरू होता. चोरट्यांनी चोरी केल्‍यानंतर ते पळून गेले. घाबरलेल्‍या तक्रारदार तोरणे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगून त्‍यानुसार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्‍यान, या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YMjoPxV

No comments:

Post a Comment