Breaking

Saturday, March 18, 2023

तनुजाने दहावीचा पेपर देऊन वडिलांच्या पार्थिवाला दिला मुखाग्नी, मामुर्डीचा लोकसेवक हरपला, उपस्थित हळहळले https://ift.tt/Nb3z1PQ

: निर्मल ग्रामपंचायत मामुर्डीचे कर्मचारी नाथमहाराज ज्ञानदेव धनावडे उर्फ आबा यांचे अल्पशः आजाराने गुरुवारी रात्री वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाल. त्यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीने दहावीचा पेपर देऊन जड अंतकरणाने वडिलांना मुखाग्नी दिला.मामुर्डी (ता. जावळी) येथील अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेले, शारीरीकदृष्टया कमजोर असलेले नाथमहाराज नावाप्रमाणे नाथ होते. गेली २५ वर्षे इमानदारीने त्यांनी ग्रामस्थांची सेवा केली. ग्रामपंचायतीची वसुलीसुद्धा ते अगदी इमानदारीने करीत असत. नाथमहाराज आई-वडिलांविना पोरके होते. काही वर्षापूवी पत्नी नीता या सुद्धा अर्ध्यावर संसार सोडून देवाघरी गेल्या. आबा यांना बाजीच्या कुटुंबीयांचे तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्यामुळे एकटे असल्याची जाणीव त्यांना कधीच झाली नाही. बोंडारवाडी कृती समितीच्या सक्रिय सदस्या कविता ओंबळे या आबांच्या लहान बहीण. कविताताई वयाने लहान असूनही त्यांनी आईसारखे प्रेम देऊन आपल्या भावाची सेवा केली. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी तनुजा दहावीची परीक्षा देते आहे. तर मुलगा सध्या सातवीत शिकत आहे. शुक्रवारी तनुजाने केळघर येथे जाऊन दहावीचा पेपर दिला. त्यानंतर तिने वडिलांचे शेवटचे सर्व विधी पार पाडून अंत्यदर्शन घेतले आणि त्यानंतर दोन्ही बहीण-भावांनी वडिलांना मुखाग्नी दिला. परिसरातून आणि आजुबाजूच्या गावांमधून अंत्यसंस्काराला आलेल्या उपस्थितांचे डोळे पाणावले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/J86ZAeR

No comments:

Post a Comment