Breaking

Wednesday, March 8, 2023

एक्स्प्रेस पकडण्यासाठी थेट पुणे स्थानकात जायची गरज नाही; आणखी एका स्टेशनवर ४ 'एक्स्प्रेस'ना थांबा https://ift.tt/pJwPNrc

म. टा. प्रतिनिधी, पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनलवर लवकरच 'हुतात्मा एक्स्प्रेस'सह चार 'एक्स्प्रेस' गाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने बोर्डाकडे पाठविला आहे. या निर्णयाला मान्यता मिळाल्यास चार मेल 'एक्स्प्रेस'मधून प्रवास करणाऱ्या हडपसर व परिसरातील नागरिकांना पुणे स्टेशनपर्यंत यावे लागणार नाही. येथून सोलापूर पुणे, दौंड डेमू या दोन नव्या गाड्या सोडण्यास सुरवात झाली आहे. तसेच, पूर्वीची हैदराबाद एक्सप्रेस देखील हडपसर येथून सुरू आहे. त्यामुळे हडपसर रेल्वे स्टेशनवरील रहदारी वाढली आहे. आता रेल्वे प्रशासनाकडून हडपसर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेससह चार मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. हडपसर रेल्वे टर्मिनलवर तीन प्लॅटफॉर्म असल्यामुळे या गाड्यांना थांबा मिळण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे पुणे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच हडपसर, खराडी, वाघोली, मुंढवा या पूर्व भागात राहणाऱ्या आणि या मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा

हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेकडून पूर्वीच कामदेखील सुरू केले होते. रस्ता रुंदीकरणासाठी ६० नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करावे; म्हणून रेल्वेचे अधिकारी पाठपुरावा करीत आहेत. त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SQgqdM

No comments:

Post a Comment