जळगाव: पत्नीनेच पतीच्या दहा लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर पत्नीच्या प्रियकराने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पतीला दहा लाखांची मागणी केली. घटना समोर आल्यानंतर धक्का बसलेल्या व्यावसायिक पतीने पोलिसात तक्रार दिली असून या तकारीवरून पत्नीसह तिचा प्रियकर अशा एकूण पाच जणांविरोधात मंगळवारी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यावसायिक तरुण हा कुटुंबासह वास्तव्यास असून त्याचे २०१२ मध्ये इंदूर येथील एका तरुणीसोबत लग्न झालं. दोघांना आठ वर्षांचा मुलगा आहे. लग्नाच्यावेळी तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणीचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधांची तसेच ती मानसिक आजारी असून तिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याची बाब लपवून ठेवली होती. लग्न झाल्यानंतर तरुणी ही पतीला तिच्या माहेरी वेगवेगळ्या कारणांवरून पैसे द्यायला भाग पडत होती. पैसे दिले नाही तर ती वाद सुद्धा घालायची आणि शिवीगाळ करुन मारहाण देखील करत असल्याचं तक्रारीत नमूद आहे.पत्नीच्या लग्नाआधीच्या प्रेम संबंधांची माहिती अन् पतीच्या पायाखालची जमीन सरकलीएके दिवशी पत्नी तिच्या माहेरी इंदोर येथे गेल्यानंतर पती तिला घ्यायला इंदूर येथे गेला. जळगावला परतत असताना पतीला त्याच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये पत्नीचे आधी प्रेमसंबंध असलेल्या नातेवाईकासोबतचे चॅटिंग दिसले. फक्त चॅटिंग नाही तर पत्नी आणि तिच्या प्रियकर या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आल्यानंतर पतीच्या पायाखालची वाळू सरकली. पत्नी नोकरी आणि मुलाखतीचा बहाणा करत तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी दूबई सुद्धा गेल्याचे तसेच पत्नी माहेरी गेल्यावर या ठिकाणी पत्नीला भेटण्यासाठी तिचा प्रियकर सुद्धा येतो, अशा गंभीर बाबी याच चॅटिंगवरुन समोर आल्या.भावाच्या लग्नाचा बहाणा अन दागिन्यांसह १० लाखांच्या रोकडवर डल्लापती जळगावातील एका पानटपरीवर गेला असता, याठिकाणी त्याच्या पत्नीचा प्रियकर आला. त्याने 'माझ्याकडे तुझ्या पत्नीचे आणि माझे फोटो असून ते व्हायरल करून देईल, फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील तर तिला घटस्फोट दे आणि मला दोन कोटी दे' अशी धमकी दिली. प्रियकराच्या धमकीनंतर १२ फेब्रुवारी रोजी पत्नीने तिच्या व्यावसायिक पतीला भावाचे लग्नासाठी इंदूरला जात असल्याचं सांगत पतीच्या कपाटातून ८० हजारांच्या दागिण्यांसह १० लाखांच्या रोकडवर परस्पर डल्ला मारला आणि पसार झाली. या सर्व गंभीर बाबींचा उलगडा, तसेच खात्री झाल्यावर अखेर मंगळवारी पतीने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पत्नी, तिचा प्रियकरासह एकूण पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kOmuazR
No comments:
Post a Comment