म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः शिडवी-न्हावाशेवा या मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी (एमटीएचएल) आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अर्थसंकल्पात हा प्रकल्प ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रकल्पातील सुविधांची कामे ऑगस्टपर्यंत चालणार असल्याचे ‘एमएमआरडीए’ने डिसेंबरअखेरीच्या तिमाही अहवालात म्हटले आहे.‘एमटीएचएल’ हा मुंबई ते उरणदरम्यानचा (नवी मुंबई) वेळ निम्म्यावर आणणार प्रकल्प आहे. हाच मार्ग पुढे चिर्लेहून पळस्पे फाट्यापर्यंत उड्डाणपुलाद्वारे मुंबई-पुणे एक्स्प्रेसशी जोडला जाणार आहे, तर वरळी ते शिवडी अशी संलग्नतादेखील या मार्गाला असेल. यामुळेच वरळी ते पुणे एक्स्प्रेस वे हे अंतर जेमतेम तासाभरात गाठण्यात ‘एमटीएचएल’ची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र तो सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्यांची प्रतीक्षा असेल.‘एमटीएचएल’च्या उभारणीसाठी जपानी आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था अर्थात ‘जायका’ने २.३८ दशलक्ष जपानी येन इतके कर्ज देऊ केले आहे. या कर्जाऊ रक्कमेचा नेमका सदुपयोग काय होतो, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून तिमाही अहवाल तयार करून तो ‘जायका’ला पाठवला जातो. या अहवालातच हा प्रकल्प संपूर्ण सुविधांसह ऑगस्ट २०२३पर्यंत पूर्ण होईल, असे नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या उभारणीशी निगडित विविध टप्प्यांना दीड ते दोन वर्षांचा विलंब झाला. तर पहिल्या, दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील कामाला वर्षभराचा विलंब झाला असून, ते ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान पूर्ण होतील, असे या अहवालात नमूद आहे.‘एमटीएचएल’ रस्त्याची उभारणी चार टप्प्यांत होत आहे. त्यापैकी पहिल्या तीन टप्प्यांत प्रामुख्याने बांधकामाशी निगडित कामांचा समावेश आहे. या टप्प्यांतील मुख्य रस्ता, समुद्रावरील १८ किमी लांबीचा पूल यांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. टप्पा १ व २, तसेच सुविधांशी निगडित टप्पा ४ला आणखी सहा महिने लागणार आहेत. प्रशासकीय इमारत, जीपीएसआधारित टोल बूथ, वाहतूक नियंत्रण व व्यवस्थापक कक्ष, सीसीटीव्ही, स्वयंचलित वाहतूक नियंत्रण, दिवे, विद्युतीकरण आदी कामे पूर्ण होण्यास ऑगस्ट उजाडणार असल्याचे ‘एमएमआरडीए’ने या अहवालाद्वारे ‘जायका’ला कळवले आहे.अशी वाढवली गेली मुदतटप्पा मूळ कालावधी विस्तारित कालावधी१ व २ मार्च २०१८ -सप्टेंबर २०२२ मार्च २०१८- सप्टेंबर २०२३३ मार्च २०१८- सप्टेंबर २०२१ मार्च २०१८- मार्च २०२३४ ऑक्टोबर २०२०- सप्टेंबर २०२२ जून २०२२- ऑगस्ट २०२३
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C6JlWhy
No comments:
Post a Comment