Breaking

Monday, March 20, 2023

क्षुल्लक कारणावरुन वाद, त्यानं धुणी धुण्याचा दगड उचलला अन् थेट बायकोच्या डोक्यात घातला... https://ift.tt/SqZ1ADX

बीड: ऊस तोडणीसाठी घेतलेली उचल का खर्चून टाकली याचा जाब विचारल्याने पतीने चक्क धूणी धुण्याचा दगड आपल्या पत्नीच्या डोक्यात टाकून तिला संपवलं आहे. गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याविषयी पती, दीर आणि पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी आक्रोश केला. इतकंच नाही तर नातेवाईकांनी काही तास शवविच्छेदन देखील रोखून ठेवले. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी या गावातील तांड्यावर राहत असलेल्या सविता सुरेश उर्फ चिंतेश्वर राठोड (वय वर्ष ३८) असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. यातील राठोड कुटुंब हे कर्नाटक येथील एका कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करतात. मात्र, हे कुटुंब आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी परत आपल्या गावी गेवराई येथील भेंड टाकळी या ठिकाणी आले होते. तीन दिवस लग्न समारंभ आटोपल्यानंतर पत्नीने पतीला आपण उचललेली जी उचल आहे ते तुम्ही का खर्चून टाकली, अशी विचारना केली. त्यामुळे दोघांत वाद निर्माण झाला आणि या वादाचं रुपांतर सततच्या कुरुकुरेत झालं.याला कंटाळून आणि रागाच्या भरात चिंतेश्वर राठोड यांनी चक्क त्यांच्या पत्नीच्या डोक्यात धुणी धुण्याचा दगडच टाकला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.ही घटना घडल्यानंतर तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मात्र, यानंतर काही काळ जिल्हा रुग्णालयात तणावाचा निर्माण झाला होता. यामध्ये नातेवाईकांनी पती, दीर आणि पुतण्या या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. यामध्ये काही काळासाठी शवविच्छेदन देखील रोखण्यात आलं होतं. मात्र, पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत या तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आणि मृत महिलेवर शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी पाठवण्यात आला. या घटनेमुळे गेवराई तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1F7zbcR

No comments:

Post a Comment