भोपाळ: पती-पत्नीमध्ये तशी तर नेहमीचं भांडणं होत असतात. अनेकदा ही भांडणं अत्यंत लहान स्वरुपाची असतात तर अनेकदा ती मोठ्या गुन्ह्यापर्यंत वाढतात. पण, पती-पत्नीच्या भांडणातून एखाद्या पतीने इतकं नाराज व्हावं की त्याने थेट आपलं अख्खं घर पेटवून टाकावं. तुम्हाला विश्वास बसत नसेन पण हे खरं आहे. बरं याला काही खूप मोठं कारण नव्हतं तर बायकोने आपल्याला न आवडणारी डाळ बनवली म्हणून या पतीने हा कारनामा केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी पत्नीने पतीसमोर जेवणाचं ताट वाढलं. तेव्हा जेवणात डाळ पाहून पतीला राग आला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही, त्याने संपूर्ण घरात रॉकेल ओतलं आणि अख्खं घर पेटवून दिलं. हे संपूर्ण प्रकरण नानाखेडा परिसरातील असून रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पती कामावरून घरी परतल्यानंतर जेव्हा तो जेवायला बसला त्यानंतर हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती आहे. नेमकं काय घडलं?पती रात्री कामावरुन घरी आला. त्यानंतर पत्नीने त्याच्यापुढे जेवणाचं ताट वाढलं. त्यात त्याला डाळ दिसली. त्याला डाळ अजिबात आवडत नाही हे माहिती असूनही पत्नीने त्याला डाळ वाढली म्हणून तो रागावला. त्यानंतर त्याने पत्नीशी भांडण केलं, तिला मारहाणही केली. मात्र, त्याचा राग काही शांत झाला नाही. रागाच्या भरात त्याने आपलंच राहातं घर पेटवून दिलं. त्यानंतर तो घराबाहेर पडला. आसपासच्या लोकांना जेव्हा ही घटना कळाली तेव्हा त्यांनी ही आग विझवली. मात्र तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. आगीमुळे घरातील सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे ३.५ लाख रोख, ३ लाखांचे दागिने आणि एक दुचाकी जळून खाक झाली आहे. एवढेच नाही तर घरात ठेवलेले वॉशिंग मशिन, स्वयंपाकघरातील साहित्य, फ्रीज, टीव्ही, कपडेही जळून खाक झाले आहेत.त्यानंतर या व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C5rGmv7
No comments:
Post a Comment