Breaking

Wednesday, March 22, 2023

दहावीचा अखेरचा पेपर झाला की उचलायचं अन्; चपलेच्या दुकानात विद्यार्थ्याच्या हत्येचा कट, पण... https://ift.tt/tPhFVnW

सातारा: जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील वेळे येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन युवकाच्या खुनाचा कट रचणाऱ्या एका युवकासह चार अल्पवयीन युवकांना वाई पोलिसांनी अटक केली आहे. वाई शहरात एका चप्पलच्या दुकानात बसून हा कट रचण्यात आला, असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे.पोलिसांनी सांगितले की, ज्या युवकाचा खून करण्यात येणार होता, त्या युवकाने कटातील अल्पवयीन युवकाला एक महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. याचा राग मनात धरून हा कट रचण्यात आला होता. २५ मार्चला युवकाचा दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर त्याला उचलून न्यायचे आणि कोयत्याने त्याला मारण्याचा कट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयित युवकाने दिली. संशयित युवकांकडून कोयता जप्त करून त्यांच्याविरोधात वाई पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना सुमारे ४ दिवसांपूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की, वाई शहरातील मुले वेळे येथील अल्पवयीन मुलाचा खून करणार आहेत. त्यानुसार, शहानिशा करुन संशयितांना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशिष कांबळे आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी वाई शहरात आणि वेळे येथे पोलीस कर्मचारी नेमून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यादरम्यान, एक मुलगा आणि चार अल्पवयीन मुलांनी वाई शहरात एका चप्पल विक्रीच्या दुकानात बसून कट केला असल्याची माहिती समजली. त्यानुसार, २१ मार्चला बाळासाहेब भरणे यांच्या आदेशानुसार आशिष कांबळे आणि डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कट रचणारा एक मुलगा आणि चार अल्पवयीन मुलांना वाई शहरातून, वेळे गावातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, वेळे येथील अल्पवयीन मुलाने कट करणाऱ्या मुलांमधील एका अल्पवयीन मुलाला सुमारे १ महिण्यापूर्वी मारले होते. याचा राग मनात धरुन २५ रोजी १० वीच्या परिक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर वेळे येथील अल्पवयीन मुलाला उचलून न्यायचे आणि कोयत्याने त्याच्यावर वार करुन त्याचा खून करायचा, असा कट रचला असल्याचे कबूल केले. कट रचणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून खून करण्यासाठी वापरण्यात येणारा कोयता हस्तगत केला आहे. यातील एक आरोपी आणि चार विधीसंषर्धग्रस्त बालकांच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे तपास करीत आहेत. या कारवाईमध्ये बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, सोनाली माने, पो. कॉ. किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी सहभाग घेतला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hJkGnrV

No comments:

Post a Comment