Breaking

Monday, March 6, 2023

ठाण्यात धुळीचं साम्राज्य; वादळामुळे सर्वत्र काळोख, हवेची गुणवत्ताही बिघडली... https://ift.tt/uAFSefd

डोंबिवली: आज एकीकडे सर्वत्र होळीचा मोठा उत्साह असताना कल्याण डोंबिवली परिसरात मात्र होळी पेटण्यापूर्वीच धुळवड साजरी होत आहे. मात्र, ही धुळवड कुणा व्यक्तींची नसून निसर्गामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे होत आहे. दिवा, कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात सर्वत्र धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचे बोलले जात आहे. परिणामी श्वसनाचा आजार असणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झाला.चार मार्च ते सहा मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे. सद्य परिस्थिती पाहता खरा होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली असून मुंबई सह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यातच आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ठाणे जिल्हातील शहर आणि ग्रामीण परिसरात काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती.जोरदार वाऱ्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्य मानता कमी झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते. दरम्यान, शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचे बोलले जात आहे. परिणामी श्वसन आजार असणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झाला.धुळे आणि नंदुरबारमध्ये पावसाचा फटकाराज्यात आज बऱ्याच ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक गेलं आहे. धुळे जिल्ह्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. मागील दोन दिवस अवकाळी पाऊस सुरु होता पण आज गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. तर दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्यात होळीनिमित्त आदिवासी बांधव होळीचा बाजार करण्यासाठी सध्या नवापूर विसरवाडी, खांडबारा, चिंचपाडा गावात मोठी गर्दी दिसून येते. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने होळी बाजाराचा उडवल्याचे चित्र नवापूर शहरात दिसले असून व्यापारांची आणि ग्राहकांची चांगली धावपळ दिसले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VZ5yXJk

No comments:

Post a Comment