Breaking

Friday, March 17, 2023

पत्नीनं बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, बंद खोलीत पतीनं दोघांना सोबत बघितलं, त्याची सटकली अन् भयंकर घडलं... https://ift.tt/UqFhr9Z

हरदोई: उत्तर प्रदेशातून अक अत्यंत भयंकर घटना पुढे आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहून पतीने प्रियकराला बेदम मारहाण करून घराबाहेरील खांबाला बांधून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विषारी द्रव्य प्राशन केल्याने या प्रियकराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस कुटुंबीयांच्या तक्रारीची प्रतीक्षा करत आहेत. फरुखाबाद जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या पंकजचे रेती पोलीस स्टेशन हद्दीतील आदमपूर येथील रहिवासी प्रतिपाल यांची पत्नी प्रीती हिच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. हिमाचल प्रदेशातील एका खासगी कारखान्यात काम करत असताना त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. यादरम्यान, दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचं ठरवलं होतं.प्रितीचा पती प्रतिपाल याला याप्रकरणाबाबत कळताच तो पत्नीसह आदमपूर या गावी आला. पण तरीही प्रिती आणि पंकज यांच्यात बोलणं सुरूच राहिलं आणि त्यांचे प्रेम वाढतच गेलं. यादरम्यान, विवाहित प्रेयसी प्रितीने प्रियकर पंकजला भेटण्यासाठी घरी बोलावलं. पंकज प्रितीला भेटायला आला. मत्र, याचवेळी पती प्रतिपालने या दोघांना रंगेहाथ पकडलं. पत्नीला बंद खोलीत दुसऱ्या पुरुषासोबत पाहून प्रतिपालच्या तळपायातली आग मस्तकात गेली. त्याने पंकजला लाथा-बुक्क्यांनी बेदम मरहाण केली. यामध्ये पंकज हा गंभीर जखमी झाला. तो बेशुद्ध पडला. पण, प्रतिपालचा राग शांत झाला नाही. इतकी मारहाण केल्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या पंकजला त्याने घराबाहेरील खांबाला बांधलं. त्यानंतर त्यानेच पोलिसांना संपर्क करुन याप्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी प्रियकर पंकजला सीएचसीमध्ये दाखल केले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या एएसपी, सीओ यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा या प्रकरणाच्या तपासात गुंतला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या एसपींनी घटनास्थळाची कसून पाहणी केली. एसपी राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, घरात विषारी पदार्थ सापडला आहे, अशा स्थितीत विषारी द्रव्य पिऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर याप्रकरणाचा तपास पुढे जाईल असंही त्यांनी सांगितलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oUZuFf2

No comments:

Post a Comment