सातारा: शिवसेनेचे माजी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम यांना ताब्यात घेतलं असून या प्रकणाचा तपास सुरु आहे. ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गोळीबार प्रकरणी मदन कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पवनचक्कीमधील पैशांच्या हिशोबावरून वाद झाल्याने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मदन कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे. मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरातील स्थानिकांनी मदन कदम यांच्या घराभोवती वेढा दिला आहे. गोळीबारात मृत्यू झालेला एकजण सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. गोळीबार झाल्याने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/syqZVm8
No comments:
Post a Comment