Breaking

Thursday, March 16, 2023

शेतात काम करताना वीज पडली, महिलेचा जागीच अंत; दोन चिमुकल्याचं मातृछत्र हरपलं; अख्खं गाव हळहळलं https://ift.tt/XfKsHb9

परभणी : शेतामध्ये ज्वारीचे खळे करत असताना महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक येथे घडली आहे. नीता गणेश सावंत (वय ३५) असं वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्या असल्याने दोन मुलांच्या आईचे छत्र हरपले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस हजरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी आणि गव्हाच्या पिकांची काढणी करून पिके घरी नेण्यासाठी शेतकरी लगबग करत आहेत. अशातच सकाळी सहा वाजेच्या सुमारास परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये पावसाने हजरी लावल्यामुळे सोनपेठ तालुक्यातील उकळी बुद्रुक येथील शेतकरी हे आपल्या पत्नीसह शेतामध्ये ज्वारीचे खळे करण्यासाठी गेले होते. दोन वाजण्याच्या सुमारास ज्वारीचे खळे करत असताना नीता गणेश सावंत या महिलेच्या अंगावर वीज कोसळली त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.सदरील घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती सोनपेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मयत नीता सावंत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, नीता सावंत यांचा वीज पडून मृत्यू झाला असल्याने धनंजय आणि मंगेश या दोन मुलांच्या आईचे छत्र हरपले आहे. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iCOKAfc

No comments:

Post a Comment