Breaking

Sunday, March 26, 2023

तुला लय मस्ती आली आहे; शाळकरी मुलाने कोयता काढला, उलटा पकडून केली मुलाला मारहाण https://ift.tt/yFs39h1

: सातार्‍यातील एका शाळेसमोर किरकोळ कारणावरुन शाळकरी मुलाला उलटा कोयता करुन त्‍याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली आहे. तक्रारदार मुलगा १६ वर्षीय असून तो नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तक्रारदार मुलगा शाळेसमोर असताना तेथे संशयित अल्‍पवयीन मुलगा गेला. 'तुला लय मस्‍ती आली आहे,' असे म्‍हणत कोयता बाहेर काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. संशयित मुलाने दमदाटी करत असताना कोयता उलटा केला व त्‍याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने तक्रारदार मुलगा घाबरला व बचावासाठी आचना करु लागले. त्‍याचवेळी कोयत्‍याच्या हल्‍ल्‍यात तक्रारदार मुलाच्या हाताला दुखापत झाली. परिसरात गर्दी होवू लागल्‍यानंतर संशयित मुलाने तेथून पळ काढला. जखमी मुलाने घडलेल्‍या घटनेची माहिती घरी सांगितल्‍यानंतर त्‍यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस हवालदार अब्दुल खलिफा यांनी तपास करुन संशयित मुलाला ताब्यात घेतले. चौकशी केल्‍यानंतर संशयित मुलगा अल्‍पवयीन असल्‍याचे समोर आले. संशयित मुलाकडून पोलिसांनी कोयता जप्‍त करुन पुढील कार्यवाही केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qN1Aml8

No comments:

Post a Comment