Breaking

Thursday, March 2, 2023

VIDEO: राजेंचा फिव्हर! चिमुकल्यांनाही उदयनराजेंची भुरळ, शाळेला निघालेली रिक्षा थांबवली... https://ift.tt/fGCwc9a

सातारा: भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस नुकताच झाला. मात्र, त्यांचा फिव्हर काही कमी होत नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवारी कराड येथील हजारमाची येथे बैलगाडा शर्यत संपन्न झाली. त्यावेळी उदयनराजे उपस्थित होते. त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या भोवताली होता. आज दिवसभर विविध विकासकामे त्यांची भूमिपूजन आणि उद्घाटन हा कार्यक्रम सुरू होता. याच दरम्यान, सकाळी रिक्षातून शाळेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांनी रिक्षा थांबवून उदयनराजेंसोबत फोटोसेशन केले.छत्रपती उदयनराजे भोसले यांची फॅन फॉलोईन खूप मोठी आहे, त्यांच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच तरुणांमध्येही त्यांची मोठी क्रेझ आहे. महाराष्ट्राभरात उदयनराजेंचे अनेक चाहते आहेत. साताऱ्यात तर प्रत्येक व्यक्ती ही उदयनराजेंना मानते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणाईची अक्षरक्ष: वाट्टेल ते करायला तयार असते. आज ही असाच एक प्रकार पाहायला मिळाला. पाहा व्हिडिओ- उदयनराजे साताऱ्यात एका भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पोहोचले होते. तेव्हा त्या ठिकाणाहून शाळेची रिक्षा निघाली. मात्र, शाळेत जाणाऱ्या या मुलींना उदयनराजे दिसले आणि या त्यांनी "महाराज साहेब" म्हणून हाक मारली. त्यांनी रिक्षा चतालकाला रिक्षा थांबवायला लावली आणि चक्क उदयनराजेंकडे धावत आल्या आणि त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला. यावेळी त्या शालेय विद्यार्थिनी खूप खूश दिसत होत्या.इतकंच नाही तर फोटो काढताना उदयनराजेंनी चिमुकल्यांसमोर डायलाॅगबाजी ही केली. उदयनराजे म्हणाले की, "सर्वांना पास व्हायचं असेल, तर माझ्यासोबत फोटो काढू नका. नापास व्हायचं असेल तर माझ्याबरोबर फोटो काढा". उदयनराजेंच्या तोंडून हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. उदयनराजे महाराज यांच्याशी झालेल्या भेटीमुळे शाळकरी मुली मात्र हरकून गेल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/THtmqKf

No comments:

Post a Comment