Breaking

Thursday, April 27, 2023

जेवण झाल्यावर महिला घरासमोर शतपावली करत होती, काही कळण्याच्या आत दुचाकीस्वारांनी साधवा डाव https://ift.tt/1XHb0DW

:जेवण झाल्यानंतर घराच्या परिसरात शतपावली करत असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याच हिसकावून पळ काढला.यात महिलेचे सात तोळ्याचे हिसकवले.ही घटना बुधवारी दि.२६ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन -१ भागात अंजली शैलेंद्र गौड या कुटुंबीयांसोबत राहतात.अंजली यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अंजली या नियमित जेवण झाल्यानंतर घराच्या परिसरात शतपावली करतात. दरम्यान अंजली यांनी बुधवारी, २६ एप्रिल रोजी सायंकाळी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर त्या नियमितपणे घराच्या समोर शतपावली करत होत्या. यावेळी एका दुचाकीवर दोघे जण आले.त्यांनी अंजली यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी अंजली यांनी लगेच मंगळसूत्राच्या समोरच्या भागाला गच्च पकडले. यामुळे मंगळसूत्राच्य दोन वाट्या अंजली यांच्या हातात राहिल्या. चोरट्यांच्या हातात आलेली चेन हिसकावून त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी अंजली यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेत अंजली यांचे सात तोळ्याचे तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने गेले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक उपायुक्त निशिकांत भुजबळ, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी अंजली गौड यांच्या फिर्यादीवरून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मंगळसूत्र चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Y6DxRmU

No comments:

Post a Comment