Breaking

Monday, April 3, 2023

२३८ एसी लोकल तर ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका, रेल्वेच्या नव्या मार्गांना सरकारकडून बळ https://ift.tt/2V5LH3t

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः राज्यात २३८ वातानुकूलित (एसी) लोकल बांधणी आणि ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंचासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमएमआरडीए’ला दिल्या आहेत.१० रेल्वे प्रकल्पांचा समावेश असलेला ३३ हजार ६९० कोटींचा एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंच मार्च २०१९मध्ये मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंडळाने ३५० कोटींचा निधी प्रकल्पसंचासाठी दिलेला आहे, मात्र राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने रेल्वे मंडळाने अतिरिक्त निधी देण्यास आखडता हात घेतला होता.एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंचाला केंद्रीय मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारडून निधी मिळालेला नव्हता. हा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. येत्या काही दिवसांत हा निधी प्राप्त होण्याची आशा आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.एमयूटीपी प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता भासल्यास ‘एमएमआरडीए’ला आर्थिक वाटा उचलता यावा यासाठी कर्जाची व्याप्तीही वाढवली जाईल. रेल्वे मंत्रालयाशीही पत्रव्यवहार केला जाईल. सर्व रेल्वे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत. ‘एमएमआरडीए’सह अन्य यंत्रणांचा वित्तीय, तसेच करार आदी बाबींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या आहेत.यंदाच्या आर्थिक वर्षात एमयूटीपी-२ आणि एमयूटीपी-३ यांसाठी एकूण ७७८ कोटींचा निधी राज्य सरकारच्या सूचनेनुसार सिडको आणि एमएमआरडीएने ‘एमआरव्हीसी’ला दिला आहे. एमयूटीपी-३ अमध्ये बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका (२६ किमी) तसेच गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गिकेचा विस्तार (७ किमी), कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका (१५ किमी), कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका (३२ किमी) या प्रकल्पांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील दहा आणि पश्चिम रेल्वेवरील आठ अशा एकूण १८ स्थानकांसाठी स्थानक सुधारणा हा प्रकल्पदेखील एमयूटीपी-३ अ अंतर्गत येतो.स्थानक सुधारणेला प्राधान्यस्थानक सुधारणेंतर्गत १८ स्थानकांत प्रवासीपूरक सुधारणा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्यावर उर्वरित स्थानकांच्या सुधारणेसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. कल्याण-बदलापूर, कल्याण-आसनगाव दरम्यान अतिरिक्त मार्गिका उभारण्यासाठीही निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सध्या घाटकोपर स्थानक सुधारणेचे काम सुरू आहे, असे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.एमयूटीपी-३मधील निवडक प्रकल्पांची स्थितीकळवा-ऐरोली उन्नत मार्गिका : खर्च - ४७६ कोटी सद्यस्थिती - ४३ टक्के पूर्णपहिला टप्पा : दिघा स्थानक - सद्यस्थिती - उद्घाटनाची प्रतीक्षादुसरा टप्पा : कळवा-ऐरोली उन्नत मार्ग - भू-संपादन रखडलेपनवेल-कर्जत नवीन उपनगरी मार्ग : २,७८२ कोटी - सद्यस्थिती - ३९ टक्के पूर्णरेल्वेरूळ अपघात नियंत्रण : खर्च - ५५१ कोटी - ५७ टक्के पूर्ण


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kapMqCr

No comments:

Post a Comment