Breaking

Thursday, April 6, 2023

विरार-डहाणू रोड परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा; 'ही' एक्स्प्रेस आता डहाणू रोडला थांबणार https://ift.tt/3grfnlW

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : विरार-डहाणू रोड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गाडी क्रमांक ०९०५१/२ मुंबई-भुसावळ-मुंबई विशेष गाडीला डहाणू रोड स्थानकात थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. आज, शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मुंबई सेंट्रलहून रात्री ११.५५ वाजता विशेष भुसावळ एक्स्प्रेस रवाना होणार असून मध्यरात्री १.५३ वाजता डहाणू रोड स्थानकात पोहोचेल आणि १.५५ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. परतीच्या प्रवासात शनिवारपासून या स्थानकात या विशेष एक्स्प्रेसला दोन मिनिटांचा थांबा देण्यात येणार आहे. उन्हाळी सूट्ट्यांतील वाढत्या गर्दीमुळे डहाणू रोड स्थानकात विशेष गाड्यांना थांबा देण्याची मागणी डहाणूतील प्रवासी संघटनांनी केली होती. मुंबई सेंट्रलहून विशेष भुसावळ एक्स्प्रेस रवाना झाल्यानंतर बोरिवली, बोईसर आणि अन्य स्थानकांवर गाडी थांबते. डहाणू रोड स्थानकात थांबा मिळाल्याने विरार परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8QYqUAx

No comments:

Post a Comment