लखनौ : कर्णधार बदलला आणि हैदराबादचा संघ तोंडावरच आपटल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कारण कर्णधार बदलल्यावर हैदराबादच्या संघाला लखनौविरुद्धच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. हैदराबादच्या संघाला या सामन्यात फक्त १२१ धावाच करता आल्या. या आव्हानाचा लखनौने सहजपणे पाठलाग केला आणि हैदराबादला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. यापूर्वी हैदराबादचे कर्णधारपद भुवनेश्नर कुमारकडे होते, पण या सामन्यात एडन मार्करम हा संघात परतला आणि त्याला संघाचे नेतृत्व देण्यात आले. पण लखनौने यावेळी हैदराबादवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला.हैदराबादच्या नवीन कर्णधाराने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. पण हा त्याचा निर्णय संघाच्या चांगलाच अंगलट आला. कारण सुरुवातीपासून जे हैदराबादच्या संघाला धक्के बसत गेले ते थांबलेच नाहीत. हैदाराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर त्यांच्या सहा फलंदजाांना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. कृणाल पंड्याने यावेळी तीन विकेट्स घेत हैदराबादच्या संघाचे कंबरडे मोडले. कृणालला यावेळी अमित मिश्राने चांगली साथ दिली. अमितने यावेळी दोन विकेट्स मिळवल्या. कर्णधार बदलल्यावर आता हैदराबादच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करताना ही सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यामुळे कर्णधार बदलल्यावर हैदराबादच्या नावावर हा नकोसा विक्रम आता झाला आहे.टी-२० क्रिकेटमध्ये १२१ धावांचे आव्हान माफक समजले जाते. पण या माफक आव्हानाचा पाठलाग करतामा मात्र लखनौच्या संघाला तीन विकेट्स गमवावे लागले. हैदराबादने प्रथम काइल माइल्सला १३ धावांवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने आपल्याच चेंडूवर दीपक हुडाचा झेल पकडला. दीपकला यावेळी सात झावा करता आल्या. पण त्यानंतर कर्णधार लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांची चांगलीतच जोडी जमली. या दोघांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. पण त्याचवेळी कृणाल बाद झाला. कृणालने यावेळी २३ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या. कृणाल बाद झाला तरी राहुल खेळपट्टीवर होता आणि त्यानेच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादच्या संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे, तर लखनौच्या संघाचा हा तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Mi6FKOy
No comments:
Post a Comment