Breaking

Monday, April 17, 2023

पाऊस पडेल म्हणून कामावरुन लवकर घरी निघाले, मात्र नियतीच्या मनात काही औरच; पिंपरीच्या 'त्या' ५ जणांची दुर्दैवी कहाणी https://ift.tt/3U9aPTL

पिंपरी: गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यात वीज पडणे, झाडे पडणे अशा अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजूर महिला आणि पुरुष हे पावसाचे वातावरण पाहून कामावरून लवकर सुटले. कामवरून घरी जात असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे ते किवळे रस्त्यावर देहूरोड आणि कात्रज रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या होर्डिंगजवळ असणाऱ्या दुकानाच्या आडोशाला थांबल्या. पण, वारा एवढा जोरात आला की त्यांना काही समजायच्या आत डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच होर्डिंग खाली कोसळले. त्यात चार महिला आणि एका पुरुषाचा जागेवरच मृत्यू झाला.मृतांमध्ये शोभा विजय टाक (वय ५०), वर्षा विलास केदारी (वय ५०), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९), भारती नितीन मंचक (वय २९), अनिता उमेश रॉय (वय ४५) अशी मृत झालेल्या महिला आणि पुरुषांची नावे आहेत. तर विशाल शिवशंकर यादव (वय २०), रहामद मोहमद अन्सारी (वय २१) आणि रिंकी दिलीप रॉय (वय ३९) अशी जखमींचा नावे आहेत.यातील सर्व कामगार हे बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. पावसाचे वातावरण झाले म्हणून ते कामावरून घरी लवकर निघाले. मात्र, रस्त्यातच त्यांना पावसाने गाठले. त्यामुळे ते आडोसा घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या होर्डिंगजवळ थांबले. तिथे पंक्चरच्या दुकानात ते थांबले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस येण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. त्यांना काही कळायच्या आत ते उभे असलले होर्डिंग त्यांच्या आंगावर पडले आणि ते त्यात त्यांचा नाहक बळी गेला. त्यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळल्यानंतर त्यांनी घटनस्थळी धाव घेत बचावकर्याला सुरुवात केली. मात्र, या अचानक घडलेल्या घटनेने पाचही जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाला अद्यापही विश्वास बसत नाहीये. या घटनेन पिंपरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MNJXj68

No comments:

Post a Comment