Breaking

Friday, April 14, 2023

काळजी घ्या, करोना पुन्हा आलाय! राज्यात करोनाचे शुक्रवारी १,१५२ नवे रुग्ण, तर ४ जणांचा मृत्यू https://ift.tt/5qo2M7U

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात शुक्रवारी करोनाने चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १,१५२ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एक मृत्यू हा मुंबईतील आहे. राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.करोनासंदर्भातील आंतराराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनुसार २४ डिसेंबरपासून राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात दोन टक्के प्रवाशांचे नमुने करोना चाचणीसाठी घेण्यात आले असून, करोनाबाधित असलेला नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आला आहे. आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी ७१ नमुने पाठवण्यात आले आहेत. आरटीपीसीआर चाचणी केलेल्या प्रवाशांची संख्या ४०,८६८ इतकी आहे.मुंबईमध्ये करोनामुळे शुक्रवारी एका मृत्यूची नोंद झाली असून, बाधित रुग्णांची संख्या २८४ इतकी नोंदवण्यात आली आहे. शहरात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या २६० असून, ऑक्सिजनच्या खाटावरील रुग्णसंख्या पाच इतकी आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे वय ९१ वर्षे असून, त्यांना मूत्रपिंडाशी संबधित सहआजार होता.मुंबईतील स्थिती- बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९८.२ टक्के- ७ ते १३ एप्रिलपर्यंत एकूण करोनावाढीचा दर - ०.०१८९ टक्के- रुग्णवाढीचा दर - ३,५५१ दिवस


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r8QaD2Y

No comments:

Post a Comment