मोहाली : पंजाबटा संघ आजच्या सामन्यात हरला. अखेरच्या षटकापर्यंत सामना रंगला, पण पंजाबला पराबव पत्करावा लागला. पण पंजाब हरली असली तरी एका अप्सराने मात्र सर्वांची मनं जिंकली. पंजाबच्या संघाची मालकीण प्रीती झिंटाच्या बाजूला ही सुंदरी बसली होती आणि सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या होत्या. आता ही सुंदरी आहे तरी कोण, याची जोरदार चर्चा सर्वत्र आहे.पंजाबचा संघ म्हटले की सर्वांच्या नजरा मैदानात सर्वात पहिल्यांदा जातात त्या प्रीतीवर. कारण प्रीतीचं स्मितहास्य कलेजा खल्लास करणारं असतं. पण या सामन्यात मात्र असं घडलं नाही. प्रीतीकडे सर्वांच्या नजरा वळल्या खऱ्या पण तिच्यावर खिळून राहिल्या नाहीत. कारण प्रीतीकडे ज्यांच्या नजरा वळत होत्या त्या तिच्या बाजूला असलेल्या सुंदरीवर खिळत होत्या. बॉलीवूडचा अरबाझ खानही तिथेच बसला होता. पण तरीही त्या सुंदरीवरून चाहत्यांच्या नजरा काही उठत नव्हत्या.ही सुंदरी नेमकी आहे तरी कोण, असे प्रश्न चाहते विचारत होते. पण उत्तर मिळत नसल्यामुळे ते अस्वस्थ होत होते. पण अखेर ही सुंदरी आहे तरी कोण, याबाबतची माहिती समोर आली. ही सुंदरी भारतामधील नाही, पण तिचे भारतामधील व्यक्तीशी खास संबंध आहेत. ही सुंदरी आहे इटलीची अभिनेत्री. या सुंदरीचे नाव आहे जाॉर्जिया अँड्रियानी. ही इटलीमध्ये अभिनय आणि मॉडेलिंग करते. आतापर्यंत तिने इटलीमध्ये बरेच काम केले आहे. पण ती इथे कशी काय दिसली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर जॉर्जिया आणि अरबाझ खान यांचे अफेअर सुरु आहे, अशी माहिती समोर आली आहे. जॉर्जिया ही अरबाझची गर्लफ्रेंड आहे आणि तो तिला हा सामना पाहण्यासाठी घेऊन आला होता. जॉर्जिया आणि अरबाझ यावेळी पंजाबच्या संघाचे टी शर्ट परीधान करून सामना पाहत होते आणि संघाला प्रोत्साहन देत होते.आजच्या सामन्यात प्रीतीची जास्त चर्चा झाली नाही. कारण ही तरुणी तिच्या शेजारीच बसली होती. पुढच्या सामन्यात पुन्हा या सुंदरीचं दर्शन होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना मात्र नक्कीच असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xzS5AE
No comments:
Post a Comment