Breaking

Thursday, April 27, 2023

सोन्यासारखं पीक घेतलं, लाखोंचं उत्पन्न येणार म्हणून सख्खे भाऊ शेतात राबत होते, तेवढ्यात नियतीने कट रचला https://ift.tt/Evj8oLz

वाशिम: तालुक्यातील कोंडाळा झामरे गावाच्या दोन सख्ख्या भावांवर वीज कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात कांदा बीज काढणीचे काम करत असतांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या दोघांवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोघेही गंभीर भाजले गेले होते. त्यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यातच सध्या कांदा बीज काढणीचा हंगाम सुरू आहे. गारपिटीने नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी कांदा बियाणे काढणीची घाई करत आहेत. आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसात वीज पडून शेतात काम करणाऱ्या कोंडाळा झामरे येथील ज्ञानेश्वर परशराम इंगोले (वय २८) आणि विठ्ठल परशराम इंगोले (वय ३६) या शेतकरी भावांवर वीज कोसळली, त्यात हे दोघेही भाजले गेले. नंतर त्यांना उपचारासाठी वाशिम येथे दाखल केले असता ज्ञानेश्वर इंगोले यांचा मृत्यू झाला आहे. तर विठ्ठलची प्रकृती चिंताजनक आहे. अत्यंत मेहनतीने पिकवला कांदा, मिळणार होते लाखोंचे उत्पादन अत्यंत मेहनती असलेल्या दोघा भावांनी यंदा बिजवाई कांद्याची लागवड केली होती आणि मोठ्या मेहनतीने पीक फुलवले होते. यावर्षी त्यांना जवळपास आठ क्विंटल बिजवाई कांद्याचे उत्पादन झाले असते. ढगाळ वातवरण पाहता नुकसान होऊनये म्हणून त्यांनी बीज काढणीचे काम सुरू केले होते. यंदाचे उत्पादन बघता त्यांना चांगला नफा मिळणार होता मात्र त्याआधीच नियतीने डाव साधला आणि होत्याचे नव्हते झाले. ज्ञानेश्वरच्या मृत्यूने इंगोले कुटुंबार मोठा आघात झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jnW0t4i

No comments:

Post a Comment