नागपूर : उपराजधानीत गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात वीजेचे खांब, झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सदर ठाणे अंतर्गत बैरामजी टाऊनच्या इटारसी पुलिया येथील धोबी मोहल्लाजवळ घरावर छतावर झाड पडले. या अपघातात एकाच परिवारातील चार जण दबल्या गेले, तर दोघांचा मृत्यू झाला. आकाश यादव (वय २२ वर्षे) आणि त्याची आई ज्योती यादव (वय ५० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर हर्ष यादव ( वय १८ वर्षे) आणि अशोक यादव किरकोळ जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन विभाग, एनडीआरएस आणि पोलिसांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले.अग्निशमन दलाने हर्ष यादव आणि त्याचे वडील अशोक यादव यांना लगेच बाहेर काढून वाचवण्यात यश आले. नंतर आकाश आणि त्याची आई या ढिगाऱ्यात दबल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. प्रथम आकाश याला बाहेर काढण्यात आले आणि त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचवेळी त्याची आई अजूनही ढिगाऱ्यात खालीच दबली गेली होती. तिला बाहेर काढण्यात पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी गुंतले होते. अनेक परिश्रम करुन तिलाही बाहेर काढण्यात आले. परंतु तेव्हा पर्यंत तिने आपले प्राण गमावले होते. मोठ्या प्रमाणात झाडे आणि विजेचे खांब पडलेसोसाट्याचा वारा आणि वादळामुळे शहरातील अनेक भागात झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे झाडे पडल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्याचवेळी विजेचे खांब पडल्याने अनेक भागात वीजही गेली. इंदोरा चौक, नरेंद्र नगर, सिव्हिल लाईन्ससह अनेक भागात झाडे पडल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून रस्त्यावरील झाडे हटवली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QhyBNdp
No comments:
Post a Comment