टोरंटो: आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सोन्याने भरलेला एक मोठा कंटेनर गायब झाला आहे. या कंटेनरमध्ये तब्बल १ अब्ज २३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने होते. या प्रकरणाबाबत तपास अधिकाऱ्याने सांगितले की, कार्गोमध्ये सोने आले होते. परंतु ते टर्मिनलमधूनच गायब झाले. अनलोडिंगच्या वेळी ही घटना उघडकीस आली.'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ही घटना कॅनडातील टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील () आहे. याबाबत इन्स्पेक्टर स्टीफन ड्युवेस्टिन यांनी सांगितले की, १७ एप्रिल रोजी पिअर्सन विमानतळावर सोन्याने भरलेला कंटेनर आला होता. मात्र, जेव्हा तो उतरवायची वेळ आली तेव्हा कळालं की तो कंटेनरच गायब झालेला होता. स्टीफन म्हणाले की, कंटेनर विमानतळावर येईपर्यंत तो दिसत होता. मात्र, जेव्हा विमानातून सामान उतरवण्यात आला तेव्हा तो अचानक बेपत्ता झाल्याचं कळालं. ते कधी आणि कोणी गायब केले हे अद्याप कळू शकलेले नाही. सध्या याप्रकणी तपास सुरू आहे. हे सोनं कोठून आलं आणि ते कुठे जात होत, याबाबत अधिकाऱ्यांनी काहीही माहिती दिली नाही. 'टोरंटो सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे सोनं उत्तर ओंटारियोमधील एका खाणीतून टोरंटोला बँकांसाठी पाठवले गेले असावे. या चोरीमागे गुन्हेगारी टोळ्यांचा हात असू शकतो. चोरीची अशी घटना यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. मात्र, या घटनेकडे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहू नये, असे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GZFf3hm
No comments:
Post a Comment