मुंबई : राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या २४ तासात १ हजार ११५ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच राज्यात करोनाचा संसर्ग झालेल्या ९१९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर एकाचा मृत्यू झाला होता. करोनामुळे प्राण गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन ती १ लाख ४८ हजार ४७० इतकी झाली आहे. राज्यात सोमवारी करोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसले. याचे कारण म्हणजे राज्यात सोमवारी ३२८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. रविवारी एकूण ७८८ जणांना करोनाची लागण झाली होती. ५६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरीदरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ५६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यात आतापर्यंत एकूण ७९ लाख ९८ हजार ४०० करोना बाधित रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.११ टक्के इतका आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. मास्क वापरण्याचे आयुक्तांचे आवाहनएकट्या मुंबईत दररोज २०० हून अधिक नवे रुग्ण आढळत असल्याने मुंबई महानगरपालिका देखील सतर्क झाली आहे. ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी केले आहे. रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स, मेडिकल टीम, कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांना पाहायला येणाऱ्या नातेवाईकांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागल्याने सरकारने शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांना देखील करोना रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी चाचण्यांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4BfL9VU
No comments:
Post a Comment