सांगली : राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? असा संतप्त सवाल माजी कृषी राज्यमंत्री यांनी सरकार विरोधात उपस्थित केला आहे.सांगलीच्या सावळी येथे आरटीओ विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या हळदीचा थेट कार्यालयाच्या दारातच लिलाव मांडत सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केले आहे.माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत राज्य सरकारवर आणि परिवहन खात्यावर चांगलेच भडकले आहेत. सांगलीच्या सावळी येथील आरटीओ कार्यालयासमोर सदाभाऊ खोत यांनी आरटीओ कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेल्या शेतकरयाच्या हळदीचा थेट लिलाव मांडत सरकारवर आणि परिवहन विभागावर सडकून टीका केली आहे.अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी येथील शेतकरी शिवाजी यादवराव वने हे आपले हळदी घेऊन विक्रीसाठी सांगलीकडे येत असताना इस्लामपूर नजीकच्या पेठे येथे सांगलीच्या आरटीओ अधिकाऱ्यांकडून अधिकचा शेतीमाल गाडीत भरल्याचा ठपका ठेवून हळदीची गाडी जप्त केली. थेट सांगलीच्या सावळी येथील कार्यालयात नेली,त्यानंतर वृद्ध शेतकरयाने कसेबसे सांगलीचे सावळी कार्यालय गाठलं,यावेळी शेतकऱ्याला ३० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. या सर्व गोष्टीची कल्पना शेतकरयाने थेट माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देताचं,सदाभाऊ खोत आपल्या कार्यकर्त्यांसह थेट सावळीच्या आरटीओ कार्यालयावर धडकले. आरटीओ विभागाच्या कारवाई विरोधात चांगलंच भडकले. संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी आरटीओ विभागाकडून जप्त केलेल्या गाडीतील हळदीचे पोते आणून थेट आरटीओ कार्यालयाच्या दारात ओतले आणि या ठिकाणीच हळदीचा सौदा सुरू केला. सदरची हळदी आरटीओ विभागाने घ्यावी आणि त्यातून येणारे पैसे शेतकऱ्याला पण द्यावे आणि त्यांचा दंड पण वसूल करून घ्यावा, अशी भूमिका सदाभाऊ खोतांनी यावेळी मांडली.त्याचबरोबर परिवहन खात्याच्या कारभारावर आणि राज्य सरकारवर सडकून टीका देखील सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे,शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारने एकदाचं ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? असा संतप्त सवाल उपस्थित करत घरचा आहेर दिला. अधिकाऱ्यांचा मुजोरपणा सरकारने थांबवावा,असा इशारा सदाभाऊ खोत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. दरम्यान, प्रकरण अगंलट येणार हे लक्षात येताच आरटीओ अधिकाऱ्यांनी दंड कमी करुन हळदीची वाहतूक करणारा टेम्पो सोडून दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sxaMTHK
No comments:
Post a Comment