नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव असो किंवा सामना सर्वांचे लक्ष लागलेले असते ते काव्या मारनवर. लिलावात अंबानी यांनाही भिडायला ती मागे पुढे पाहत नाही, तर मैदानात तिच्या अदांनी ती सर्वांना घायाळ करत असते. पण याच काव्या मारनने आयपीएलच्या लिलावात महाराष्ट्राच्या एका हिऱ्याला संधी दिली आणि तोच आत हैदराबादसाठी मॅचविनर ठरला.यापूर्वी आयपीएलच्या दोन्ही सामन्यांत हैदराबादला पराभव पत्करावा लागला होता. हैदराबादला आपल्या संघाचे खाते उघडता आले नव्हते. पण अखेर तिसऱ्या सामन्यात हैदराबादला विजय मिळवता आला आणि विजयाचा नायक ठरला तो महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी. पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. पण महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे पूर्ण चित्रच बदलले. राहुलच्या या अर्धशतकाच्या जोरावर हैदबादला पंजाबवर आठ विकेट्स राखत विजय मिळवता आला आणि आपल्या गुणांचे खाते उघडता आले. पण राहुलसारखा हिरा पारखला तो काव्या मारनने. आतापर्यंत राहुलचा प्रवास हा चांगलाच राहिला आहे. राहुल त्रिपाठीचा जन्म भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे शहर रांची येथे झाला. त्याचे वडील सैन्यात होते, त्यामुळे राहुल अनेक ठिकाणी राहिला. अखेरीस तो पुण्याला गेला आणि महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळायला लागला. २०१७ मध्ये रायझिंग पुणे जायंट्सने राहुलला पहिल्यांदा संधी दिली. पहिल्याच सत्रात त्याने १४ सामन्यात १४६.४४ च्या स्ट्राईक रेटने ३९१ धावा केल्या. तो मोसमातील सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू होता. आयपीए २०२१ मध्ये राहुलने केकेआरसाठी १४० च्या स्ट्राइक रेटने ३९७ धावा केल्या. लक्षात घ्यायचे की राहुलने २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटन्स फ्रँचायझीकडून आयपीएल पदार्पण केले होते. पण २०२२ साली झालेल्या लिलावात राहुलचे नशिब बदलले. आयपीएल २०२२ च्या लिलावात ४० लाखांच्या मूळ किंमतीत राहुल त्रिपाठीला सनरायझर्स हैदराबादने () ८.५ कोटींमध्ये विकत घेतले. राहुलचा फिटनेस हा विराट कोहलीपेक्षाही चांगला आहे, असे म्हटले जाते. राहुल त्रिपाठी फिटनेसमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकू शकतो, असा विश्वास भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंहने व्यक्त केला होता. आयपीएल २०२१ मध्ये भज्जी राहुलसोबत कोलकाता नाइट रायडर्स टीममध्ये एकत्र होते. त्यामुळे हरभजन ही गोष्ट सांगू शकला. पण आता राहुल बाकीच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/86zErm2
No comments:
Post a Comment