Breaking

Friday, April 21, 2023

मच्छी मिळाली नाही म्हणून खून, मग स्वत:च्या मृत्यूचा बनाव, अखेर २७ वर्षांनी पकडला गेला https://ift.tt/LaKISN4

रत्नागिरी: खेड एमआयडीसी येथून मच्छी दिली नाही याचा राग मनात धरून लोखंडी रॉड डोक्यात घालून अत्यंत निर्घृणरित्या खून करून तब्बल २७ वर्षे फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून खेड पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश येथील सुरेश चंद्रराम खिलावन अस या संशयित आरोपीचे नाव आहे. खेड पोलिसांच्या पथकाने त्याच्या छीमी पुरीइन ता. खागा जिल्हा फतेहपुर उत्तर प्रदेश येथून मुसक्या आवळल्या आहेत.सखाराम जानू मांजरेकर (वय-३८ वर्षे रा.कोळंबे भरणकरवाडी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी) याचा लोटे एमायडीसीत येथे खून झाला होता. फायरटेक इक्विपमेंट अँड सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आरोपी आणि खून करण्यात आलेले सखाराम मांजरेकर हे कंपनीतील सहकारी होते. यावेळी आरोपी सुरेश चंद्रराम याला रात्रीच्या जेवणामध्ये मच्छी मिळाली नाही, याचा राग अल्याने त्याने मृत याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून अत्यंत निर्घृणरित्या सुरेश मांजरेकर याचा खून केला होता. या आरोपी वरती खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. गेले २७ वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. या सगळ्या खून प्रकरणाची फिर्याद सुनील केशव जाडे (वय-२० वर्षे व्यवसाय-माळीकाम व आचारी राहणार मौजे-तळसर, तालुका-चिपळूण) यांनी खेड पोलीस ठाण्यात केली होती. खेड पोलीस ठाणे येथील प्रलंबित असणारे पाहिजे आरोपी, फरारी आरोपीचा यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, अजय कडू, वैभव ओहोळ, राम नागुलवर, तूषार झेंड यांनी या पथकात सहभाग घेतला होता.यांच्या पथकाने सुरेश चंद्र राम खीलवान याचा त्याच्या छीमी पुरीइन ता. खागा जिल्हा. फतेहपुर राज्य. उत्तरप्रदेश येथील राहत्या पत्त्यावरील परिसरात स्थानिक पोलीस व गोपनीय माहिती, जुन्या अभिलेखाचे पडताळणीच्या आधारे शोध घेतला. यावेळी हा आरोपी सुरेशचंद्र राम खीलवान सध्या वय ५० वर्षे हा छीमी पुरीइन ता. खागा जिल्हा. फतेहपुर राज्य. उत्तरप्रदेश येथे खेड पोलीस ठाणेचे तपास पथकास मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याने खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. स्वतःच्या मृत्यूचा बनवलाहा आरोपी गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाणे बदलून वास्तव्य करत होता. इतकेच नव्हे तर त्याने २००८ मध्ये स्वतःचा बनावट मृत्यू दाखला बनवून तो मयत झाल्याचे भासवून लपून राहत असल्याचे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुजित गडदे करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jfOG6wl

No comments:

Post a Comment