Breaking

Tuesday, April 18, 2023

टॉयलेटमध्ये जन्म देत बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं, पुण्यातल्या प्रकारणाचं धक्कादायक वास्तव https://ift.tt/Ns9wkFi

पुणे: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपआपल्या परीने जगण्याची इच्छा असते. आज मोबाईलमुळे जग देखील जवळ आले आहे. त्यात प्रेम प्रकरणे देखील समोर येत आहेत. अल्पवयीन मुलांची प्रेम प्रकरणं सध्या वाढत असून अशा अनेक घटना समोर येत आहेत. घरच्यांपासून ही प्रकरणे लपून सुरू असतात त्यातून अनेक वाईट घटना घडतात. त्यात एक वेगळा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. नात्यातील मुलाशी एका मुलीचे प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमाच्या नात्यातून संबधित मुलगी गर्भवती राहिली. ही गोष्ट तिच्या लक्षात आली. त्यामुळे ती पुण्यातल्या नवले रुग्णालयात पाठ आणि अशक्तपणा या कारणामुळे भरती झाली. मात्र, आपल्या पोटात गर्भ आहे हे कुणाला समजू नये म्हणून तिने रुग्णालयाच्या शौचालयात त्या गर्भाला जन्म देऊन तो गर्भ खिडकीतून बाहेर फेकून दिला. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घरच्या लोकांपासून हे प्रकरण लपवून ठेवण्यासाठी तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे तिने सांगितले. याबाबत नवले हॉस्पिटलचे वैदयकीय अधीक्षक नंदा गणपत ढवळे यांनी माहिती दिली की, शनिवारी सकाळी ७:३० वाजता नवले हॉस्पिटलच्या कॅज्युअलटी वार्डमध्ये एका १९ वर्षाची अविवाहित मुलगी पाठीचा त्रास,अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याचं सांगत रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, ती तपास करताना व्यवस्थित प्रतिसाद देत नव्हती. तसेच, तिने तिच्या मासिक पाळीची तारीख देखील चुकीची सांगितली होती. त्यानुसार, तिला गर्भवती असल्याबाबतची टेस्ट करण्यास सांगितली. मात्र, त्याला ती तयार होत नव्हती. त्यादरम्यान ती तीन ते चार वेळा बाथरूममध्ये गेली. ती सकाळी १०.३० वाजता बाथरूममध्ये गेली. मात्र, ती बराच वेळ होऊन देखील बाहेर आली नाही. त्यानंतर जवळपास दिड तासाच्या कालावधीनंतर ती बाहेर आली. तेव्हा तिला खूप रक्तस्राव होत असल्याचं आमच्या लक्षात आले. त्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी दखल केले. त्या दरम्यान बाथरूम चोक अप झाल्याने ते दुरुस्ती करता प्लंबरला बोलवण्यात आले. त्यावेळी प्लंबरला दुरुस्ती करत असताना एक अर्भक दिसले. त्याने याबाबत तात्काळ रुग्णालय प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाकडून बाथरुमाला जाऊन आलेल्या सर्व पेशंटची तपासणी करण्यात आली. त्यात हे अर्भक या १९ वर्षीय मुलीचे असल्याचे समोर आले. त्यानुसार, प्रशासनाकडून सिंहगड रोड पोलिसात तक्रार देण्यात आली. याबाबत टीम तपास अधिकारी अस्मिता ढवळे यांनी सांगितले की, मुलगी प्रेग्नेंट असल्याची माहिती तिला नव्हती. मात्र, तिचे एका नात्यातल्या मुलासोबत प्रेम संबंध होते. त्याच्यासोबत शाररिक संबंध देखील संपादन केले होते आणि त्यातूनच ती गर्भवती राहिली होती. मात्र, याची माहिती कोणाला कळू नये म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल होत हा प्रकार केल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय मुलीवर गुन्हा दाखल केला असून सध्या ती नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.अशा घटनांधून एका गोष्ट समोर येते की, आपलं कुणावर प्रेम असेल तर त्याची माहिती घरच्यांना नक्की द्या किंवा तुमचे संबधित व्यक्ती सोबत जर शरीर संबंध झाले असतील. त्यातून जे बाळ होणार आहे त्याच्यावर अन्याय करू नका. कारण, त्यात त्याची काय चूक असते. त्यामुळे अशा गोष्टी करताना काळजीपूर्वक विचार करा. ज्यातून तुमचं आयुष्य तर उद्धवस्त तर होइल. त्याचा जीव का घेता. जग बघण्यागोदरच ते उद्धवस्त होईल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/B0To32x

No comments:

Post a Comment